Bigg Boss Marathi 4: पहिल्याच दिवशी राखीने उडवली स्पर्धकांची झोप, विकास सोबतचा वाद विकोपाला

विशाल आणि राखी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडणं झाल्याचे पाहायला मिळणार आहे.
Rakhi Sawant And Vikas Nikam Had war in Bigg Boss Marathi 4
Rakhi Sawant And Vikas Nikam Had war in Bigg Boss Marathi 4 Saam Tv

Bigg Boss Marathi 4 Latest Update: 'बिग बॉस मराठी 4'मध्ये एक नवीन पर्वा पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये काल चार चॅलेंजर्सची एन्ट्री झाली आहे. हे चारही स्पर्धक बिग बॉसमधील पुरते मुरलेले खेळाडू आहते. बिग बॉस लेडी मीरा जगन्नाथ, ड्रम क्वीन राखी सावंत, आरोह वेलणकर आणि तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम हे चॅलेंजर्स बिग बॉसच्या घरामध्ये आले आहेत. पहिल्याच दिवशी चॅलेंजर्सनी घरातील सदस्यांना फटकारले आहे. आता या चॅलेंजर्समध्येही वाद होताना आपल्याला दिसणार आहेत. विशाल आणि राखी यांच्यामध्ये वादाला सुरूवात झाली आहे.

Rakhi Sawant And Vikas Nikam Had war in Bigg Boss Marathi 4
Bigg Boss 16: टीना दत्ताला अश्रू अनावर; शिव ठाकरेला म्हणाली, "तुझ्यापेक्षा शत्रू बरे"

बिग बॉसच्या घरातील सर्वच स्पर्धक तसे बेधडक आहेत. जे आहे ते तोंडावर असा अनेकांचा स्वभाव आहे. राखी सावंत तिच्या स्पष्ट आणि बेधडक स्वभावासाठीच ओळखली जाते. राखी कधी काय बोलेल आणि कधी काय करेल याचा नेम नाही. विशाल सुद्धा स्पष्टवक्ता आहे. त्याच्या मनात एक आणि बाहेर एक असं काही नसतं. कोणाचाही पर्वा न करणाऱ्या राखी आणि विशालमध्ये वाद झाला आहे.

कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या सोशल मीडियावे एक प्रोमो शेअर केले आहे. या प्रोमोमध्ये विशाल आणि राखी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडणं झाल्याचे पाहायला मिळणार आहे. घरातील दिवे बंद झाल्यानंतर राखी सावंत बिग बॉसना 'माझी कॉफी पाठवा आत', असे सांगते. त्यावर विशाल तिला म्हणतो की, तुमच्या बोलण्याने त्रास होत आहे. मॅडम झोपा आता.' यावर राखी 'तू झोप, मला सांगू नकोस' असे म्हणते. विशाल सुद्धा शांत राहत नाही. इथे अरेरावी करू नका, असे तो उत्तर देतो. राखी 'माझी मर्जी' असे विशालला सांगते. त्यावर विशालने देखील 'सगळीकडे मर्जी चालणार नाही', म्हणतो. मी कोणालाही झोपू देणारा म्हणत राखी सुरू होते. (Rakhi Sawant)

बिग बॉसच्या घरातील चॅलेंजर्समधील वाद इतर सदस्यांना किती महागात पडेल हे फक्त बिग बॉसनाच माहीत. या वादाची सुरुवात खरंतर अमृता आणि राखीच्या भांडणाने झाली आणि हा वाद विशाल आणि राखीच्या भांडणावर आला आहे. आता हा वाद किती वाढतो हे पाहणं महत्वाचं आहे. हे चॅलेंजर्स घरातील सदस्यांचा खेळ बदलणार की त्यांच्या खेळात सदस्य भरडले जाणार हे आपल्याला येत्या भागात कळणार आहे. (Bigg Boss Marathi)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com