Tomato Effect On Bollywood Celebrity
Tomato Effect On Bollywood CelebritySaam Tv

Tomato Effect On Bollywood Celebrity: टॉमेटो महागल्यानं सेलिब्रिटींचंही बजेट कोलमडलं, सुनिल शेट्टीसह ‘या’ अभिनेत्याला बसला फटका

Tomato Price Effect On Suniel Shetty: टॉमेटोच्या वाढत्या दराचा फटका सर्व सामान्य जनतेला तर बसतच आहे, पण आता सेलिब्रिटींनाही या भाववाढीचा फटका बसला.
Published on

Suniel Shetty News: सध्या राज्यासह देशभरात टॉमेटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टॉमेटोच्या वाढत्या दराचा फटका सर्व सामान्य जनतेला तर बसतच आहे, पण आता सेलिब्रिटींनाही या भाववाढीचा फटका बसला. या भाववाढीत अनेक सेलिब्रिटी होरपळून निघाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राखी सावंतने भाववाढीवर आपली प्रतिक्रिया दिली होती. अशातच त्या नंतर आता बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनेही आपली प्रतिक्रिया दिली. नुकतंच त्याने या विषयी भाष्य एका मुलाखतीत केले आहे.

सुनील शेट्टी एक अभिनेता असून तो एक हॉटेल मालक देखील आहे. सध्या सर्वत्रच टॉमेटोचे दर वाढत असताना, अभिनेत्याच्या वक्तव्याची तुफान चर्चा सुरू आहे. टॉमेटोच्या वाढत्या दराबाबत तो म्हणतो, “मी आणि माझी बायको नेहमीच घरी दोन दिवसांच्या भाज्या घेऊन येतो. कारण आम्हाला ताज्या भाज्या खायला आवडतात. भाज्यांची आम्ही ऑनलाईन खरेदी करतो, ऑनलाईन भाज्या स्वस्त असल्यामुळे आमची थोडी फार बचत ही होते. भाज्या कुठून आल्या आहेत इथपासून कुठल्या मातीमधून भाजी आली आहे, इतकी माहिती आपल्याला या ॲपवर मिळते. याचा फायदा शेतकऱ्यांना होतो.”

Tomato Effect On Bollywood Celebrity
Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीनंतर आता वीणाही अन्याच्या कानाखाली वाजवणार; अनिरुद्धचं आता सर्वच पितळ उघड पडणार

सुनील शेट्टी मुलाखतीत पुढे म्हणतो, “टोमॅटो हा स्वयंपाकघरातील महत्त्वाचा भाग आहे, मात्र वाढत्या किंमतीमुळे सॅलेड आणि भाज्यांमध्ये टॉमेटोचा वापर कमी केला आहे. मी आधीच टॉमेटो खात नाही. मी जरी सेलिब्रिटी असलो तरी, अनेकांना असं वाटतं की, या सर्व गोष्टींचा माझ्यावर कोणताच परिणाम होत नाही. मी सेलिब्रिटी असलो तरी, या सर्व गोष्टींचा सामना आम्हाला ही करावा लागतो…”

तर सोबतच ‘जवान’ फेम अभिनेता विजय सेतुपतीच्या चाहत्यांनी त्याच्या एका कामगिरीमुळे त्याचे कौतुक केले आहे. टोमॅटोच्या भावामुळे हैराण झालेल्या सर्व सामान्य जनतेला विजयच्या फॅन ग्रुपने टोमॅटोचे मोफत वाटप केले आहे. टोमॅटो हा प्रत्येक घरातील स्वयंपाकघरातील महत्त्वाचा भाग आहे, अशा परिस्थितीत सामान्य जनतेच्या समस्या कमी करण्यासाठी टोमॅटोचे वाटप करण्यात आले आहे, असे अभिनेत्याच्या फॅन्स ग्रुपचे म्हणणे आहे.

Tomato Effect On Bollywood Celebrity
What Jhumka Release: जुनं ते सोनं! ‘व्हॉट झुमका’ गाण्यात आलिया- रणवीरचे जबरदस्त ठुमके; नेटकऱ्यांनी दिल्या भरभरून प्रतिक्रिया

टोमॅटोच्या दरांबद्दल बोलायचे तर, सध्या टोमॅटोचे बाजारात दर १४० रुपये किलो इतके आहेत. टॉमेटोच्या या भावामुळे सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींचेही मासिक गणित कोलमडलंय. सध्या सर्वसामान्य जनता, सेलिब्रिटी आणि सोशल मीडियावर देखील टोमॅटोच्या वाढत्या दरांबद्दल चर्चा रंगते. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत राहतात. सुनील शेट्टी सध्या अभिनयापासून दूर असले तरी अभिनेता त्याच्या, वैयक्तित आयुष्यामुळे चर्चेत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com