What Jhumka Release: जुनं ते सोनं! ‘व्हॉट झुमका’ गाण्यात आलिया- रणवीरचे जबरदस्त ठुमके; नेटकऱ्यांनी दिल्या भरभरून प्रतिक्रिया

RRKPK What Jhumka Song Out: ‘तुम क्या मिले’ या गाण्याला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिल्यानंतर ‘व्हॉट झुमका’ हे दुसरं गाणं प्रदर्शित झाले आहे.
RRKPK What Jhumka Song Shared
RRKPK What Jhumka Song SharedSaam Tv

RRKPK What Jhumka Song Shared: आलिया- रणवीर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’मधील नुकतंच दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. चित्रपटाच्या टीझरला, ट्रेलरला आणि पहिल्या गाण्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. ‘तुम क्या मिले’ या गाण्याला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिल्यानंतर ‘व्हॉट झुमका’ हे दुसरं गाणं प्रदर्शित झाले आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटासाठी प्रेक्षक खूपच उत्साहित असून या गाण्याला प्रेक्षकांनी अल्पावधितच चांगला प्रतिसाद दिला.

RRKPK What Jhumka Song Shared
Bigg Boss OTT 2 News : 'बिग बॉस ओटीटी २'च्या घरात पुजा भट भडकली, सर्वच स्पर्धकांची काढली खरडपट्टी

‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर आलिया- रणवीरने हा जबरदस्त डान्स केला असून या जोडीने लगावलेल्या ठुमक्यांची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. या गाण्यात रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या लूकनेही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. काही वेळापूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला सोशल मीडियावर २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘व्हॉट झुमका’ अरिजित सिंग आणि जोनिता गांधी यांनी हे गायले असून या गाण्याला संगीत ज्येष्ठ संगीतकार प्रीतम यांनी दिले आहे.

‘व्हॉट झुमका’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून हे गाणं ऐकल्यावर आपल्याला ९०च्या दशकातील ‘झुमका गिरा रे’ या गाण्याची आठवण करून देते. या गाण्यात निर्मात्यांनी जुन्या गाण्यातील काही लिरिक्सचा देखील वापर केलेला आहे.

‘व्हॉट झुमका’ हा जुन्या गाण्याचा रिमेक नसून ते गाणे ऐकल्यावर ‘झुमका गिरा रे’ या गाण्याची आपल्याला नक्की आठवण येईल. आलिया- रणवीरची या गाण्यातील लव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच भावली असून गाण्याची ही सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाण्याने नेटकऱ्यांना विचारात टाकले आहे. पूर्वीचीच गाणी फक्त नव्या रूपात सादर करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. यासगळ्यात काही आलियावरही नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. आलियाच्या ‘व्हॉट झुमका’ हे गाणं अनेकांच्या रागाचे कारण ठरताना दिसत आहे.

RRKPK What Jhumka Song Shared
Ramya Krishnan On Her Past Relationship: विवाहित पुरुषासोबत अफेअर आणि बरंच काही...; बाहुबलीतील 'शिवगामी'ने शेवटी सत्य आणि तथ्य काय ते सगळंच सांगितलं

येत्या २८ जुलैला प्रदर्शित होणार असून करण जोहर तब्बल सात वर्षांच्या कालावधीनंतर तो दिग्दर्शनात पुन्हा पदार्पण केलं आहे.मुख्य भूमिकेत रणवीर सिंग, आलिया भट्ट सोबत शबाना आझमी, धर्मेंद्र,जया बच्चन आणि मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग देखील या चित्रपटात दिसणार आहे. इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर चित्रपटाची निर्मिती करण जोहर, हिरू जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com