Shahrukh Khan : 'मन्नत'मध्ये फोनवर बोलण्यास का आहे बंदी? कारण वाचून डोळ्यात येईल पाणी

Mannat House Strict Rules : बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान अलिकडेच 'मन्नत' बंगल्यावरून चांगलाच चर्चेत आहे. आता 'मन्नत'मध्ये फोनवर बोलण्यास बंदी असल्याचे समोर आले आहे. यामागचे नेमकं कारण काय जाणून घेऊयात.
Mannat House Strict Rules
Shahrukh KhanSAAM TV
Published On

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या तो तिचा बंगला 'मन्नत'मुळे चांगलाच चर्चेत आहे. शाहरुख खानला पाहण्यासाठी 'मन्नत' बाहेर (Mannat House Strict Rules) चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते. 'मन्नत' बंगला देखील खूप आकर्षक आहे. मात्र या बंगल्याचे खूप कडक नियम देखील आहे. त्यातील एक नियम म्हणजे 'मन्नत' मध्ये फोनवर बोलण्यास बंदी आहे. यामागचे नेमकं कारण जाणून घेऊयात.

कारण काय?

'मन्नत'मध्ये फोनवर बोलण्यास मनाई आहे, कारण यामागे शाहरुख खानने कुटुंबाची प्रायव्हसीचा विचार केला आहे. प्रायव्हसीचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन 'मन्नत'मध्ये फोनवर बोलण्यास बंदी घातली गेली आहे. घरामध्ये कुटुंबाने एकत्र रहावे आणि छान वेळ घालवावा म्हणून हा नियम करण्यात आला आहे. मोबाईलचा कमीत कमी वापर आणि कुटुंबासोबत जास्त वेळ हे 'मन्नत'चे सूत्र आहे. या नियमामुळे शाहरुख खान स्वतः घरात फोनवर बोलण्यास टाळतो.

सध्या शाहरुख खान त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत त्याची लेक सुहाना खान झळकणार आहे. बाबा लेकीला एकत्र पाहण्यासाठी चाहेत देखील खूप खुश आहेत. 'किंग' हा चित्रपट 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे बोले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष आहेत.

शाहरुख खानचा मुंबईतील वांद्रे येथे मन्नत नावाचा आलिशान बंगला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानने 2001 मध्ये मन्नत बंगला १३ कोटी खरेदी केला. शाहरुख खानसाठी 'मन्नत' बंगला घर नसून एक भावना आहे. शाहरुख खानने खूप कष्टाने 'मन्नत' बंगला उभारला आहे.

Mannat House Strict Rules
Alia-Ranbir : कपूर कुटुंबात लवकरच पाळणा हलणार, आलिया-रणबीर दुसऱ्या बाळाचं करतायत प्लॅनिंग?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com