Gauri Khan : गौरी खान 'मन्नत'चे २ मजले वाढवणार; कोस्टल अथॉरिटीकडे घेतली धाव, नेमकं प्रकरण काय?

Gauri Khan Mannat Bungalow : गौरी खानने मन्नत बंगल्याचे मजले वाढवण्यासाठी कोस्टल अथॉरिटीकडे परवानगी मागितली आहे. नेमकं यामागचे कारण काय, जाणून घ्या.
Gauri Khan Mannat Bungalow
Gauri Khan SAAM TV
Published On

बॉलिवूडचा किंग खान नेहमी आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आता मात्र शाहरुख खान आणि त्याची बायको एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत.

शाहरुख खानचा मुंबईतील वांद्रे येथे मन्नत नावाचा आलिशान बंगला आहे. त्याचा बंगला 2091.38 चौरस मीटर जमिनीवर बांधण्यात आला आहे. हा बंगला सहा मजली आहे. HTच्या वृत्तानुसार, गौरी खान (Gauri Khan) यांनी 9 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडे एक अर्ज दाखल केला. ज्यात मन्नत (Mannat Bungalow) या बंगल्याच्या क्षेत्रामध्ये 616.02 चौरस मीटर वाढ करून दोन अतिरिक्त मजले जोडण्याची मागणी केली.

गेल्या दोन वर्षांत अनेक क्रिकेटपटू, उद्योगपती यांनी वाढीव एफएसआयच्या तरतुदींचा वापर केला आहे, असे प्रॅक्टिसिंग इंजिनीअर्स, आर्किटेक्ट्स आणि टाऊन प्लॅनर्स असोसिएशनचे सदस्य मनोज डायसरैया यांनी सांगितले. प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या अध्यक्षतेखालील समिती बुधवारी गौरी खानच्या अर्जावर निर्णय देणार आहे. मात्र अद्यापही गौरी खानला हे दोन मजले का वाढवायचे आहे, याची माहिती समोर आली नाही.

गौरी खानने केलेल्या मागणीमध्ये मन्नत बंगल्यात सातवा आणि आठवा मजला जोडायचा आहे, ज्यामध्ये सध्या दोन लेव्हल बेसमेंट, एक तळमजला आणि सहा मजले आहेत. या प्रकल्पाची किंमत अंदाजे ₹ 25 कोटी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानने 2001 मध्ये मन्नत बंगला १३ कोटी खरेदी केला. मन्नत बंगल्या बाहेर शाहरुख खानला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. शाहरुख खान मन्नत बंगला 'बाई खोरशेद भानु संजना ट्रस्ट'कडून 'विला विएना'ची खरेदी केला होता.

Gauri Khan Mannat Bungalow
Yo Yo Honey Singh : हनी सिंगचे आयुष्य लवकरच मोठ्या पडद्यावर, कधी रिलीज होणार डॉक्युमेंटरी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com