Sonu Sood: 'रिअल लाइफ हिरो' सोनू सूदला मिळाला 'चॅम्पियन्स ऑफ चेंज' अवॉर्ड, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Champions Of Change Award: सोनू सूद नेहमीच लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असतो. त्याची हिच मदत करण्याची वृत्ती अनेकांना प्रचंड आवडते. त्याच्या या कामाचे नेहमीच कौतुक होत आले आहे.
Sonu Sood Got Champions Of Change Award
Sonu Sood Got Champions Of Change AwardInstagram
Published On

Bollywood Actor Sonu Sood:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) नेहमी काहीना काही कारणास्तव चर्चेत असतो. कधी चित्रपटांसाठी तर कधी सामाजिक कार्यासाठी सोनू सूदची नेहमी चर्चा होत असते. कोरोना काळापासून सोनू सूद गरीब नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात आहे. अजूनही त्याची मदत करण्याची ही प्रक्रिया सुरूच आहे. देशभरातील नागरिकांना शक्य तशी तो मदत करत असतो. त्याचे चाहते कधी त्याच्या घराबाहेर जाऊन तर कधी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीची मागणी करत असतात. सोनू सूद देखील मोठ्या मनाने त्यांना मदत करतो. याच उत्कृष्ट कार्यामुळे सोनू सूदला त्याचे चाहते देव मानतात.

सोनू सूद नेहमीच लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असतो. त्याची हिच मदत करण्याची वृत्ती अनेकांना प्रचंड आवडते. त्याच्या या कामाचे नेहमीच कौतुक होत आले आहे. आता सोनू सूदला त्याच्या या परोपकारी कामासाठी आणि उत्कृष्ट मानवतावादी प्रयत्नांसाठी प्रतिष्ठित 'चॅम्पियन्स ऑफ चेंज' पुरस्कार (champions of change award) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. नि:स्वार्थ प्रयत्नांसाठी प्रसिद्ध असलेला सोनू सूद कायम सामाजिक कल्याणासाठी त्यांच्या अतूट वचनबद्धतेसाठी ओळखला जातो.

'द सूद फाउंडेशन' या आपल्या धर्मादाय संस्थेद्वारे अभिनेत्याने वंचितांना शिक्षणाच्या बाबतीत मदत केली आहे. गरिबांना त्यांच्या उद्योगांना चालना देण्यास मदत केली. सोनू सूदने त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर काम देखील सुरू केले आहे. एक वृद्धाश्रम देखील त्याने उभारलं आहे.'चॅम्पियन्स ऑफ चेंज' ही ओळख त्याच्या कामाचा अनोखा पुरावा आहे. त्यांच्या पुढाकाराने फक्त तात्काळ दिलासा मिळाला नाही. तर संकटकाळात सामूहिक कृती आणि एकजुटीला प्रेरणा दिली आहे.

Sonu Sood Got Champions Of Change Award
Akshay Kumar ची मुलगी निताराला कुत्र्याचा चावा, ट्विंकल खन्नाने सांगितला तो किस्सा...

सोनू सूदने नुकताच त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट पूर्ण केला आहे. 'फतेह' हा एक सायबर क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मीती सोनू सूदची निर्मिती कंपनीने केली आहे. तर शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज सह-निर्मित आहे.

Sonu Sood Got Champions Of Change Award
कशाला जीव घेते तिचा..., Gautami Deshpande ला वाढदिवसानिमित्त मृण्मयीने दिल्या अशा शुभेच्छा; VIDEO वर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com