Shaitaan Movie: 'शैतान' मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार टीझर

Ajay Devgn First Look From Shaitaan Movie: नुकताच शैतान या चित्रपाटाचे पोस्टर आऊट झाले होते. त्याचसोबत निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहिर केली होती. आता या चित्रपटामधील अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
Ajay Devgn First Look From Shaitaan Movie
Ajay Devgn First Look From Shaitaan MovieSaam Tv
Published On

Ajay Devgn Teaser Release Date:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'शैतान'मुळे (Shaitaan Movie) चर्चेत आहे. अजय देवगण शैतान या सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपाटाचे पोस्टर आऊट झाले होते. त्याचसोबत निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहिर केली होती. आता या चित्रपटामधील अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सध्या अजय देवगणचा शैतानमधील फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अजय देवगणचे 2024 मध्ये एका पाठोपाठ एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिंगम अगेन नंतर अजय देवगणच्या हाती शैतान चित्रपट देखील लागला आहे. सध्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटाच्या नवीन पोस्टरवर आर माधवन आणि ज्योतिका देखील दिसत आहेत. अजय देवगणच्या फर्स्ट लूकसोबत निर्मात्यांनी शैतान चित्रपटाच्या टीझरची तारीख देखील जाहीर केली आहे. अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका यांचा सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट शैतान 8 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

अजय देवगणने बुधवारी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट 'शैतान'चे नवीन पोस्टर शेअर केले. चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये अजय देवगणचा फर्स्ट लूक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चित्रपटातील इतर स्टार्स आर माधवन आणि ज्योतिका यांचा फर्स्ट लूकही पाहायला मिळत आहे. 'शैतान' चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाचा टीझर २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत आहेत.

Ajay Devgn First Look From Shaitaan Movie
Fighter Movie: हृतिक रोशन- दीपिका पदुकोणला मोठा धक्का, 'फायटर'ला या आखाती देशांमध्ये बंदी; फक्त UAE मध्ये होणार रिलीज

अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, त्याचे 5 चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहेत. अजय देवगणचा चित्रपट 'शैतान' मार्चमध्ये रिलीज होणार आहे, 'औरों में कहां दम था' आणि 'मैदान' हे चित्रपट एप्रिललध्ये प्रदर्शित होणार आहे. ऑगस्टमध्ये 'सिंघम अगेन' आणि नोव्हेंबरमध्ये 'रेड 2' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणचे चाहते त्याच्या या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अजय देवगण शेवटचा मार्च २०२३ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'भोला' चित्रपटात दिसला होता.

Ajay Devgn First Look From Shaitaan Movie
Kangana Ranaut: 'मी दुसऱ्याला डेट करतेय', निशांत पिट्टीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर कंगना रनौतने सोडलं मौन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com