Fighter Movie: हृतिक रोशन- दीपिका पदुकोणला मोठा धक्का, 'फायटर'ला या आखाती देशांमध्ये बंदी; फक्त UAE मध्ये होणार रिलीज

Fighter Movie Banned In Gulf Countries: सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट रिलीज होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशामध्ये रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाच्या टीमला धक्का बसला आहे.
Fighter Film
Fighter Film Saam Tv
Published On

Hrithik Roshan And Deepika Padukone:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या त्यांचा आगामी 'फायटर' चित्रपटामुळे (Fighter Movie) चांगलाच चर्चेत आहे. हृतिक आणि दीपिकाच्या या चित्रपटाबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असून ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे मुख्य भूमिकेत आहेत. 25 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशामध्ये रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाच्या टीमला धक्का बसला आहे.

हृतिक रोशनचा 'फायटर' चित्रपट ५ मोठ्या आखाती देशांमध्ये रिलीज होणार नाही. कारण या देशांमध्ये फायटर चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटावर या देशांमध्ये बंदी का घालण्यात आली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. व्यवसाय तज्ज्ञ गिरीश जोहर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ५ मोठ्या आखाती देशांनी फायटरवर बंदी घातली आहे. फायटर फक्त यीएईमध्ये प्रदर्शित होणार आहे. यूएईमध्ये सेन्सॉर बोर्डाने PG15 रेटिंगसह चित्रपटाला रिलीजसाठी परवानगी दिली आहे.

गल्फ कोऑपरेशन कॉन्सिल म्हणजेच GCC मध्ये बहरीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशांचा समावेश आहे. यापैकी यूएई सोडून इतर सर्व देशांनी फायटर चित्रपटावर बंदी घातली आहे. या चित्रपटावर बंदी का घातली यामागचे कारण समोर आले नाही. गिरीष जोहर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले की, 'एक धक्का बसला आहे. फायटरला मध्य पूर्व देशांमध्ये थिएटरमध्ये रिलीज करण्यासाठी अधितृतपणे बंदी घालण्यात आली आहे. फक्त यूएईने PG15 रेटिंगसह परवानगी मिळाली आहे.

Fighter Film
Kangana Ranaut: 'मी दुसऱ्याला डेट करतेय', निशांत पिट्टीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर कंगना रनौतने सोडलं मौन

बॉलिवूड चित्रपटांच्या कलेक्शनमध्ये आखाती देशांचा मोठा वाटा असतो. मध्य पूर्वेतील हे देश भारतीय चित्रपटांसाठी चांगली बाजारपेठ असल्याचे सिद्ध झाले आहे. अशामध्ये फायटरसारख्या जबरदस्त चित्रपटाला मोठी बाजारपेठ नसल्यामुळे या चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम नक्कीच होणार आहे. फायटर चित्रपटाचे बजेट 250 कोटी रुपये आहे. अशापरिस्थितीत आखाती देशांनी बंदी घातल्यामुळे या चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम होण्यार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Fighter Film
Bade Miyan Chote Miyan Teaser: 'दिल से सोल्जर, दिमाग से शैतान हैं हम', अक्षय -टाइगरच्या'बडे मियां छोटे मियां'चा धमाकेदार टीझर आऊट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com