बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफचा(Tiger Shroff) बहुप्रतीक्षित 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan Movie) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. देशभक्तीशी संबंधित असलेल्या या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.
अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. अली अब्बास जफरने प्रेक्षकांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे टीझर पाहून स्पष्ट होत आहे. भव्य अॅक्शन, हाय ऑक्टेन ड्रामा, भावनांचा ओव्हरफ्लो आणि प्रचंड देशभक्ती हे सर्व 'बडे मियाँ छोटे मियाँ' च्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
या चित्रपटाचा नुकताच रिलीज झालेल्या 1 मिनिट 38 सेकंदाच्या या टीझरमध्ये भारतावर महाप्रलय येणार असल्याचे ऐकू येत आहे. मात्र, या चित्रपटाचा टीझर तुम्हाला गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'जवान', 'पठान' आणि 'टायगर 3' सारख्या अनेक चित्रपटांची आठवण करून देईल. कारण या चित्रपटांमध्येही कथा तीच आहे. ज्यामध्ये भारताचे सैनिक शत्रूंचा पराभव करताना दिसणार आहेत.
'दिल से सोल्जर, दिमाग से शैतान हैं हम। बचकर रहना हमसे, हिन्दुस्तान हैं हम।' अशा प्रकारचे जबरदस्त संवाद या चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐकायला मिळत आहेत. या संवादांसोबत चित्रपटातील जबरदस्त अॅक्शन सर्वांना पाहायला मिळणार आहे. या टीझरची सुरुवात , 'महाप्रलय येत आहे, जे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य बदलेल. एक प्रलय जो चांगल्या आणि वाईट यांच्यातील युद्ध कायमचा संपवेल. भारताचा नाश होईल. मला कोण रोखू शकेल?', या संवादाने होते.
या टीझरमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, अक्षय आणि टायगरचा हा चित्रपट यावर्षी ईदला पाहायला मिळणार आहे. अली अब्बास जफरच्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, पृथ्वीराज सुकुमारन, अलाया एफ आणि रोनित रॉय हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पूजा एंटरटेनमेंट आणि एएझेड फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एप्रिल 2024 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग स्कॉटलंड, लंडन, भारत आणि यूएईमध्ये करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.