Ajay Devgn: 'आझाद'चा धमाकेदार ट्रेलर लाँच; अजय देवगणची घोड्यासोबत एन्ट्री, पाहा VIDEO

Azaad Movie Trailer Launch : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या 'आझाद' चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अजय देवगण चक्क घोड्याला घेऊन आला. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Azaad Movie Trailer Launch
Ajay DevgnSAAM TV
Published On

बॉलिवूडचा ॲक्शन हिरो अजय देवगण (Ajay Devgn) आता पुन्हा एकदा नव्या चित्रपटासोबत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजय आपल्या ॲक्शन मोडने चाहत्यांना घायाळ करतो. तो कायमच प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करत आला आहे. अजय देवगण अलिकडेच रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये पाहायला मिळाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला.

आता अजय देवगण 'आझाद' (Azaad) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला. या कार्यक्रमाला चित्रपटाचे सर्व सदस्य उपस्थित होते. या चित्रपटात बॉलिवूडचे अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण या चित्रपटात दिसणार आहे. तसेच रविना टंडनची लेक राशा थडानी देखील या चित्रपटात आहे.

'आझाद' चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले आहे. या ट्रेलर लाँचचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. यातील एक व्हिडीओमध्ये चक्क चित्रपटातील कलाकर घोड्यासोबत फोटोशूट करताना पाहायला मिळत आहे. अजय देवगण घोड्यासोबत एन्ट्री घेतो. या चित्रपटात घोडा खूप महत्त्वाचा आहे.

'आझाद' चित्रपट हा 17 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगणचा नवीन वर्षातील हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून राशा थडानी आणि अमन देवगण बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. 'आझाद' चित्रपटात एका घोडेस्वाराची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात घोडेस्वाराच्या भूमिकेत अजय देवगण पाहायला मिळत आहे.

Azaad Movie Trailer Launch
Pushpa 2 Collection : पुष्पा भाऊचा जगात बोलबाला; पार केला 1200 कोटींचा टप्पा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com