Ajay Devgn, Azaad film teaser out
Ajay Devgn, Azaad film teaser outsaam tv

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

Azaad Teaser, Ajay devgn : अजय देवगणचा आझाद नावाचा नवा चित्रपट येतोय. त्याचा टीझर नुकताच लाँच झाला आहे. यात त्याची एकेकाळची सहकलाकार रविना टंडनची मुलगी मुख्य भूमिकेत असणार आहे.
Published on

Azaad Teaser Out : अजय देवगणच्या 'आझाद' या चित्रपटाचा टीझर ५ नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. एकीकडे अजयचे चाहते त्याच्या सिंघम अगेन चित्रपटाचा थिएटरमध्ये आनंद घेत आहेत, तर दुसरीकडे त्याच्या चित्रपटाच्या घोषणेने त्यांचा आनंद आणि उत्सुकता द्विगुणित झाली आहे. चित्रपटाची कथा एका धाडसी आणि निष्ठावान घोड्यावर केंद्रीत असल्याचे टीझरमध्ये पाहायला मिळते.

जानेवारी 2025 मध्ये 'आझाद' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टीझरमध्ये अजय देवगण ब्रिटिशांना सामोरे जाताना दिसत आहे. अनेक दृश्यांमध्ये तो धोकादायक ॲक्शन करतानाही दिसत आहे. अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी रशा थडानी आणि अजय देवगणचा भाचा अमन देवगन हे दोघेही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

टीझर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. 'आझाद'च्या टीझरमध्ये अजय देवगण जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहे, तर त्याच्यासोबत त्याचा भाचा अमन देवगणही चांगला अभिनय करताना दिसत आहे. हा चित्रपट अभिषेक कपूरने दिग्दर्शित केला आहे. अभिनेता अजय देवगणनेही त्याच्या सोशल मीडियावर टीझर शेअर केला आहे.

Ajay Devgn, Azaad film teaser out
Singham Again OTT Release: ॲक्शनचा धमाका घरबसल्या अनुभवा, OTT गाजवायला येणार 'सिंघम'

2024 प्रमाणेच 2025 मध्ये देखील अजय देवगण त्याच्या चाहत्यांना आगळीवेगळी भेट देणार आहे. या अभिनेत्याचा सिंघम अगेन नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने अवघ्या 4 दिवसांत 140 कोटींचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, त्याने याआधीच आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. दुसरीकडे, मंगळवारीच अजय देवगणने चाहत्यांना या चित्रपटाची एक आनंदाची बातमी दिली आहे. या चित्रपटाच्या टीझरलाही चाहत्यांनी पसंती दिली आहे.

Edited By - Dhanshri Shintre

Ajay Devgn, Azaad film teaser out
Singham Again VS Bhool Bhulaiyaa: सिंघम अगेन की भुल भूलैया 3, तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा टॉप १० मधील 'तगडा' चित्रपट कोणता?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com