Sarangkheda Horse Yatra: १९ कोटींचा घोडा पाहिला का? ना ऑडी, ना फेरारी; चर्चा फक्त सारंगखेड्याच्या 'बिग जास्पर'ची

Sarangkheda Big Jasper Horse Price 19 Crores : सारंगखेडा घोडे बाजारात दाखल झालेला एका रुबाबदार घोडा सध्या चांगलाच भाव खात आहे. या घोड्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
Sarangkheda Big Jasper  Horse
Sarangkheda Big Jasper Horse Price 19 CroresSaam Tv
Published On

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

सारंगखेडा घोडे बाजारात दरवर्षी दाखल होणारे विविध जातीचे घोडे हे नेहमीच चर्चेचा विषयही ठरतात. सारंगखेड्याच्या चेतक फेस्टीव्हलमध्ये दाखल झालेल्या बिग जास्पर घोड्याची. अहिल्यादेवीनगरच्या राजवीर स्टडफार्म सांभाळ करत असलेला हा घोडा सध्या सर्वाच्याच चर्चेचा विषय ठरला आहे.विदेशातून एक दोन अलिशान मोटार येईल यापेक्षाही महागड्या किंमतीच्या बिग जास्परची किंमत आहे, तब्बल 19 कोटी रुपये.

Big Jasper  Horse Price 19 Crores

मारवाडी ब्लड लाईनचा असलेला बिग जास्पर हा 68 इंची असून महाराष्ट्रातील सर्वात जास्त उंचीचा घोडा असल्याचा दावा त्यांचे मालक करत आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल आणि संजमसिंग बादल यांच्याकडे सांभाळा झालेल्या बिग जास्परला अहिल्यादवी नगरचे माजी आमदार अरुण जगताप आणि विद्यमान आमदार संग्राम जगताप, सचिन जगताप यांनी खरेदी केलेला आहे.

Big Jasper  Horse Price 19 Crores

याचे मालक जगताप कुंटूबीय असून सध्या त्याची राखण ही राजवीर स्टड फार्म यांच्याकडून केली जात आहे. बिग जास्परचे वय 9 वर्ष इतके असून त्याचा रखरखाव हा स्वतंत्र ठेवल्या जातो. त्याची काळजी घेण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल पाच जणांची टिंम बनविण्यात आली आहे. तर आरोग्याच्या तपासणी साठीचे वैद्यकीय पथकही वेगळे आहे.

बिग जास्परचा आहार देखील साधा असला तरी त्याला रोज जेवणात करड्याची कुट्टी व चन्याचा खूराक आणि सात लिटर दुध दिल्या जाते. त्यामुळेच त्याच्या देखण्या रुपासोबत त्याची ब्रिड गुणवत्ताही उत्तम असल्याने त्याला हिं 19 कोटींची किंमत ठेवली असल्याचे त्याचे मालक सांगतात. बिग जास्परच्या ब्रिंडींगने पैदास झालेल्या घोड्यांची उंची आणि रुप देखील देखण मिळाले आहे.

त्यामुळे उच्च ब्लड लाईनच्या या घोड्याचा चेहरा, कान, मान , पुठ्ठा, सर्वच आकर्षक आहे.सारंगखेड्याचा बाजारात दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे महागडे घोडे विशेष शो साठी दाखल होतात. मात्र त्यांचे मालक ते घोडे विक्री करत नाही. मात्र घोड्यांच्या चांगला जाणकार आणि ठेवलेली अपेक्षीत किंमत मिळाली तर बिग जास्परची विक्री केल्या जाईल असे त्यांचे मालक सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com