Bol Bol Rani: सस्पेन्स, ट्विस्ट आणि रहस्याचा खेळ; सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी'चा थराराक ट्रेलर प्रदर्शित

Bol Bol Rani : सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या ‘बोल बोल राणी’चा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १७ जुलैला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Bol Bol Rani
Bol Bol RaniSaam Tv
Published On

Bol Bol Rani : मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित ‘बोल बोल राणी’ या रहस्य आणि थरारपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. अपहरण, खून, संशय आणि एकामागून एक उलगडणारी रहस्ये अशा अनेक गूढ घटनांनी भरलेला हा ट्रेलर प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. प्रत्येक फ्रेममध्ये वाढणारा सस्पेन्स आणि अनपेक्षित ट्विस्टमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

ट्रेलरमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर एका अत्यंत वेगळ्या आणि रहस्यमय भूमिकेत दिसत आहे. संपूर्ण कथानक तिच्या पात्राभोवती फिरत असल्याचे ट्रेलरमधून दिसते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागे नेमके कोणते सत्य दडले आहे? ती या रहस्याची बळी आहे की त्यामागची सूत्रधार? अशा अनेक प्रश्नांची उकल चित्रपटात होणार असल्याचे ट्रेलरमध्ये दिसते.

Bol Bol Rani
Sunita Ahuja: 'काश्मीरा माझ्या पायांवर पडली...'; कृष्णा अभिषेकसोबतचा वाद कसा मिटला? सुनीता आहुजांचा खुलासा

चित्रपटात सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या भूमिकाही तितक्याच गूढ आणि संशयास्पद दाखवण्यात आल्या आहेत. प्रत्येक पात्र काहीतरी लपवत असल्याची भावना ट्रेलरमध्ये सातत्याने जाणवते. कोण सत्याच्या शोधात आहे, कोण या कटाचा भाग आहे आणि कोण स्वतः या रहस्याच्या जाळ्यात अडकला आहे, याची उत्सुकता ट्रेलर कायम ठेवतो. त्यामुळे प्रत्येक पात्रावर संशय निर्माण होतो आणि प्रत्येक ट्विस्ट प्रेक्षकांचा अंदाज चुकवतो.

Bol Bol Rani
FAOच्या जागतिक परिषदेत बारामतीच्या ADTची दखल; AI आधारित शेती संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता

चित्रपटाचे दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणाले, “‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरमधून आम्ही केवळ रहस्याची एक झलक दाखवली आहे. प्रत्येक पात्राचं एक गुपित आहे आणि प्रत्येक ट्विस्ट प्रेक्षकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळा असेल. विशेषतः सई ताम्हणकरने साकारलेली भूमिका तिच्या कारकिर्दीतील सर्वांत वेगळी ठरणार आहे. ही कथा प्रेक्षकांना प्रत्येक क्षणी नवा धक्का देईल.”

‘न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड’ निर्मित या चित्रपटाचे निर्माते अपूर्वा मोतिविले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली आहेत. तर यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. रहस्य, थरार आणि सस्पेन्सचा अनोखा संगम असलेला ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट १७ जुलै रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये त्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com