Sunita Ahuja: 'काश्मीरा माझ्या पायांवर पडली...'; कृष्णा अभिषेकसोबतचा वाद कसा मिटला? सुनीता आहुजांचा खुलासा

Sunita Ahuja: ज्येष्ठ अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता आहुजाचा पुतण्या कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी काश्मीरा शाह यांच्यासोबत अनेक वर्षे सुरु होता. यावादाबद्दल सुनिताने मोठा खुलासा केला आहे.
Sunita Ahuja
Sunita AhujaSaam Tv
Published On

Sunita Ahuja: ज्येष्ठ अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता आहुजाने पुतण्या कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी काश्मीरा शाह यांच्यासोबत अनेक वर्षे सुरू असलेल्या कौटुंबिक वादाबाबत मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना सुनीता यांनी हा वाद कसा संपला, याबद्दल सविस्तर सांगितले. त्यांच्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.

लॉक अप याशोमध्ये सुनीता आहुजा म्हणाली की, कृष्णाला तिने स्वतःच्या मुलासारखे वाढवले. त्यामुळे त्याच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांना खूप मानसिक त्रास झाला होता. मात्र, नाते कायमचे तुटू नयेत, अशी तिची नेहमीच इच्छा होती. वाद संपुष्टात येण्यामागचा प्रसंग सांगताना सुनीता म्हणाली, "काश्मीरा माझ्या पायांवर पडली आणि तिने मनापासून माफी मागितली. त्यानंतर मीही सगळ्या गोष्टी मागे सोडण्याचा निर्णय घेतला." तिने स्पष्ट केले की, नात्यांमध्ये अहंकारापेक्षा प्रेम आणि आपुलकी अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे जुन्या कटु आठवणी विसरून त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

Sunita Ahuja
Choreographer Hospitalised: अचानक छातीत त्रास झाला; प्रसिद्ध कोरिओग्राफरची तब्येत बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल

सुनीताने हेही सांगितले की, कृष्णावर तिचे आजही तितकेच प्रेम आहे. राग किंवा मतभेद असले तरी तो त्यांचा पुतण्या आहे आणि त्याच्याविषयीच्या भावना कधीच बदलल्या नाहीत. कुटुंब एकत्र राहावे, हीच त्यांची कायम इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

Sunita Ahuja
FAOच्या जागतिक परिषदेत बारामतीच्या ADTची दखल; AI आधारित शेती संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता

गेल्या काही वर्षांत गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील दुरावा अनेकदा चर्चेत राहिला होता. विविध मुलाखती आणि टीव्ही कार्यक्रमांमधून या वादाचा उल्लेख झाला होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये नेमके काय सुरू आहे, याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता होती. आता सुनीता आहुजा यांनी केलेल्या या खुलाशानंतर कृष्णा आणि काश्मीरासोबतचे संबंध पूर्ववत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com