Gopichand Padalkar New Song: 'आमच्या नादाला लागण्याआधी...'; भाजप आमदाराच्या गाण्याने सोशल मीडियात कल्ला

MLA Gopichand Padalkar New Song: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं नवीन गाणं ‘होळकरशाही’ सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अवघ्या २४ तासांत लाखो व्ह्यूज मिळाल्याने गाण्याची जोरदार चर्चा.
Gopichand Padalkar New Song
Gopichand Padalkar New SongSaam Tv
Published On

MLA Gopichand Padalkar New Song: भाजपच्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा नवीन गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. २ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांनी “आमच्या नादाला लागण्याआधी… एकदा होळकरशाही आठवा” हे नविन गाणं रिलीज झाले आहे. ते त्यांचं तिसरं गाणं असून याआधी २ गाणी प्रदर्शित झाली आहेत.

गोपीचंद पडळकर हे त्यांच्या आक्रमक आणि स्पष्ट भाषणासाठी राजकारणात ओळखले जातात, पण या गाण्याद्वारे त्यांनी आपला सर्जनशील व सांस्कृतिक पक्षही लोकांसमोर आणला आहे. गाण्याचे बोल पडळकरांनी स्वतः सादर केले असून, सचिन माळी यांनी त्याचे शब्द लिहिले आहेत. संगीत आणि गायनाची जबाबदारी मिलिंद शिंदे, शीतल साठे व अनिकेत मोहिते यांनी सांभाळली आहे.

Gopichand Padalkar New Song
Dhurandhar 2 Teaser: लियारीमध्ये हमजाची हुकूमत..; रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2'चा धमाकेदार टिझर रिलीज

व्हिडीओमध्ये पडळकर स्वतः मुख्य भूमिकेत दिसत असून, त्यांच्या अभिनयावर चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. काहींना त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. गाणे प्रदर्शित झाल्यानंतर अगदी पहिल्या २४ तासांत तब्बल १.५ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यामुळे हे गाणं आणखी चर्चेचा विषय बनला आहे.

Gopichand Padalkar New Song
Golmaal 5: अक्षय कुमारची 'गोलमाल 5' मध्ये एन्ट्री; अजय देवगणसोबत करणार जबरदस्त अॅक्शन

सोशल मीडियावरील कमेंट बॉक्समध्ये समर्थकांनी पडळकरांच्या या सर्जनशील प्रयत्नांचे कौतुक केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी या गाण्याची चेष्टा केली आहे. एका नेटकऱ्याने लिहीले, बॉलीवूड मधील हिरो पेक्षा भारी आमचा हिरो, आणखी एकाने लिहीले, संघर्ष योद्धा गोपीचंद पडळकर साहेब, आणखी एकाने लिहीले, काय हे.. अगरबत्ती.. उदबत्ती..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com