Bigg Boss Winner : बिग बॉसच्या घरात स्पर्धक इंटीमेट होतात? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

Bigg Boss Winner Talk On Contestants Intimacy : बिग बॉसच्या विजेत्या स्पर्धकाने बिग बॉसच्या घरातील अनेक गोष्टींबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. बिग बॉसच्या घरात स्पर्धक इंटीमेट होतात का? याबद्दल अभिनेत्री नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
Bigg Boss Winner Talk On Contestants Intimacy
Bigg Boss Winner SAAM TV
Published On
Summary

'बिग बॉस २०' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बिग बॉस २०' चे होस्टिंग सलमान खान करणार आहे.

बिग बॉसच्या विजेत्या स्पर्धकाने बिग बॉसच्या घराबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत.

सध्या सर्वत्र 'बिग बॉस २०' ची चर्चा पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान लवकरच 'बिग बॉस २०' घेऊन येणार आहे. टिव्ही इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या नावांची चर्चा 'बिग बॉस २०' साठी रंगली आहे. अनेक कलाकारांची बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा असते. बिग बॉसचे घर, घरातील गोष्टी, किचन, जेवण, खेळ आणि चोवीस तास कॅमेरे याचे अनेकांना आकर्षण असते. अलिकडेच एक मिडिया मुलाखतीत बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनची विजेता दिव्या अग्रवालने बिग बॉसच्या घराबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री अलिकडेच दिव्या अग्रवालने Shaardulogy या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. या तिने 'बिग बॉस' च्या घरापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे केले. दिव्या जेव्हा घरातील प्रायव्हसी, सदस्यांमधील नाती, सेक्स आणि इंटीमेट होण्याबाबत तिने प्रतिक्रिया दिली की, ती हसली आणि म्हणाली, "कॅमेरासमोर काहीही दिसत नसले तरी आतमध्ये बरेच काही घडते..." यावर पॉडकास्टच्या होस्टने बाथरूममध्येही बरेच काही घडत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

दिव्याने सांगितले की लोक तिला इतके विचित्र प्रश्न विचारतात की ते ऐकून तिला हसू येते.एकदा त्याला कुणीतरी विचारलं होतं की, बाहेरून लोक घरात वॅक्सिंग करायला येतात का? दिव्याने स्पष्ट केले की, "असे कोणीही घरात येत नाही आणि स्पर्धकांना स्वतःची ग्रूमिंग करावी लागते. बाहेरून मदत नाही..."

प्रेक्षकांना अनेक वेळा असा प्रश्न पडतो की, बिग बॉसच्या घरात दारू दिली जाते का? यावर खुलासा करत अभिनेत्री म्हणाली की, "बिग बॉसच्या घरात कोणालाही दारू दिली जात नाही. लोकांमध्ये ही एक मोठी अफवा आहे आणि हाच प्रश्न लोक शो सोडल्यानंतर त्याला सर्वाधिक विचारतात..." दिव्याने सांगितल्याप्रमाणे बिग बॉसमध्ये सिगारेट दिली जाते.

Bigg Boss Winner Talk On Contestants Intimacy
Bollywood Actor : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने केले वार, प्रकृती चिंताजनक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com