Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलते ठरली 'बिग बॉस मराठी ६'ची विजेता; रितेश भाऊंनी ट्रॉफीसोबत दिली 'ही' खास भेटवस्तू | VIDEO

Riteish Deshmukh Gifted For Tanvi Kolte : तन्वी कोलतेने 'बिग बॉस मराठी ६'च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विजेत्या झालेल्या तन्वी कोलतेला रितेश देशमुखने एक खास गिफ्ट दिले.
Riteish Deshmukh Gifted For Tanvi Kolte
BBM 6 winner Tanvi Kolte -Riteish Deshmukhsaam tv
Published On
Summary

'बिग बॉस मराठी ६' ची विजेता तन्वी कोलते झाली.

तन्वीला रितेश देशमुखने खास गिफ्ट दिले.

तन्वीला ट्रॉफीसोबत लाख रुपयांचे बक्षिस मिळाले.

रितेश देशमुख होस्ट करत असलेला 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले थाटामाटात पार पडला. तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६'ची विजेता ठरली, तर राकेश बापट उपविजेता झाला. टॉप ५ मध्ये विशाल कोटीयन, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि तन्वी कोलते होते. आता सोशल मीडियावर तन्वी कोलतेची चर्चा पाहायला मिळत आहे. विजेत्या तन्वी कोलतेला खूप भेटवस्तू मिळाल्या. ती 'बिग बॉसची क्वीन' आणि बिग बॉसच्या घरातील 'टास्क क्वीन' ठरली.

तन्वी कोलतेला बक्षीसात काय काय मिळाले?

तन्वी कोलतेला 'बिग बॉस मराठी ६' ची चमकदार ट्रॉफी मिळाली. त्यानंतर तब्बल १५ लाखांचा चेक मिळाल. तसेच पु.ना.गाडगीळ आणि सन्स यांच्याकडून १० लाखांचे Voucher आणि तुनवाल ई-मोटर्सकडून ई-बाईकही मिळाली. सध्या सर्वत्र तन्वी कोलतेचे कौतुक होत आहे. तिच्यावर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.

रितेश भाऊंनी दिली खास भेट

'बिग बॉस मराठी ६' ची विजेता तन्वी कोलतेला रितेश भाऊंनी देखील एक खास भेट वस्तू दिली आहे. त्यांनी तन्वीला छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेली फ्रेम गिफ्ट केली आहे. जिला पाहून तन्वी खूप भावुक झाली आणि तिला आनंद झाला. रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट २ मे ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. रितेशचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

bigg boss marathi 6 winner
bigg boss marathi 6 winnersaam tv

तन्वी कोलतेची प्रतिक्रिया

'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी जिंकल्यावर तन्वी कोलतेने सर्वांचे आभार मानले. ती म्हणाली की, "१०० दिवसांनी ही ट्रॉफी माझ्या हातात आली आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याचे माझे स्वप्न होते. मी आई-बाबांना नेहमी सांगायची की मला 'बिग बॉस'मध्ये जायचे आहे. कारण हा शोमुळे आपल्याला स्वत:च्या नावाने ओळख मिळते. मी तन्वी कोलते म्हणून आले होते आणि आज तन्वी कोलते हा ब्रँड मिळवून जातेय..."

Riteish Deshmukh Gifted For Tanvi Kolte
Riteish Deshmukh - Raja Shivaji : 'राजा शिवाजी' मध्ये सलमान खानची एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार? रितेश देशमुखने सर्वकाही सांगितले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com