Bigg Boss Marathi 6 Finale: 'घरी वहिनींचा धक्का...'; ‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनालेमध्ये जिनिलिया आणि अभिषेक बच्चनची खास एन्ट्री

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठी ६ च्या ग्रँड फिनालेला दमदार सुरुवात झाली असून रितेश देशमुखसोबत जिनिलिया आणि अभिषेक बच्चनची खास एन्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Bigg Boss Marathi 6 Finale
Bigg Boss Marathi 6 Finale Saam tv
Published On
Summary

'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड फिनाले थाटामाटात पार पडत आहे.

ग्रँड फिनालेचे होस्टिंग रितेश देशमुख करत आहे.

ग्रँड फिनालेमध्ये जेनेलिया देशमुख आणि अभिषेक बच्चन यांची धमाकेदार एन्ट्री झाली आहे.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला बिग बॉस मराठी ६आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून ग्रँड फिनालेची जोरदार सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या शोचा महाअंतिम सोहळा मोठ्या थाटामाटात रंगत आहे. रितेश देशमुख यांच्या दमदार होस्टिंगमुळे यंदाचा सीझन विशेष गाजला.

ग्रँड फिनालेमध्ये विशेष आकर्षण म्हणून जेनेलिया देशमुख आणि अभिषेक बच्चन यांची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे फिनालेचा रंग आणखी खुलला असून प्रेक्षकांसाठी हा सोहळा अधिकच खास ठरला आहे. या स्टार्सची एन्ट्री आणि धमाल पाहायला मिळत असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Bigg Boss Marathi 6 Finale
Death News: प्रसिद्ध निर्मात्यावर दु:खाचा डोंगर; अक्षय तृतीयादिवशी जवळच्या व्यक्तीचे निधन

या फिनालेमध्ये येऊन अभिषेक बच्चनने रितेश भाऊसोबत धमाल केली. यावेळी बिझनेसमॅन रिझवान साजन यांच्यासोबत अभिषेत बच्चनने केबीसी स्टाईल गेम खेळला. यामध्ये दुबईची परिस्थीती कधी आहे. बिझनेस कसा वाढवला यांसारखे रंजक प्रश्न विचारले. यावेळी राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल बोलताना अभिषेक बच्चन भावूक झाला. तसेच रितेशचे दिग्दर्शक म्हणून भरभरुन कौतूक केले.

Bigg Boss Marathi 6 Finale
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार? 'हा' नाही 'ही' स्पर्धक मारणार बाजी

या फिनालेमध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनी जेनेलिया देशमुखची एन्ट्री झाली. मराठमोळी साज नाकात नथ खणाची साडी असा सुंदर लूक तिने केला होता. यावेळी जेनेलियाने तिच्या चुलबुल्या अंदाजात प्रेक्षक आणि बिग बॉसच्या सदस्यांसोबत गप्पा मारल्या. यावेळी जेनिलिया म्हणाली राजा शिवाजी चित्रपटासाठी मी प्रेक्षकांचा आशिर्वाद घेण्यासाठी बिग बॉसच्या मंचावर आले आहे. यावेळी घरी कोण बॉस असतं या प्रश्नाचे उत्तर देताना जेनिलिया मी घरात बॉस असते असे म्हणाली.

टॉप 5 स्पर्धक

राकेश बापट

तन्वी कोलते

अनुश्री माने

विशाल कोटियन

दिपाली सय्यद

जानेवारी 2026 मध्ये सुरू झालेल्या या शोने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सुरुवातीला अनेक स्पर्धकांनी घरात प्रवेश केला होता, मात्र आता स्पर्धा टॉप फायनलिस्टपर्यंत पोहोचली आहे. टास्क, वाद, मैत्री आणि ट्विस्ट्समुळे हा सीझन प्रचंड गाजला. दरम्यान, फिनालेमध्ये स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. आता सर्वांच्या नजरा महाविजेत्यावर खिळल्या असून ‘बिग बॉस मराठी ६’ची ट्रॉफी कोण उचलणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com