Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार? 'हा' नाही 'ही' स्पर्धक मारणार बाजी

Bigg Boss Marathi 6: सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी ६'च्या विजेत्याची चर्चा पाहायला मिळत आहे. काही तासांत 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले सुरु होणार आहे. विजेता कोण होणार हे जाणून घेऊयात.
Bigg Boss Marathi 6 Winner
Bigg Boss Marathi 6 WinnerSaam tv
Published On

Bigg Boss Marathi 6: महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुखचा रिॲलिटी शो 'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले आता काही तासांवर आला आहे. काही तासांत बिग बॉसला त्याच्या ६ व्या सीझनचा विजेता भेटेल. 'बिग बॉस मराठी ६' च्या ग्रँड फिनालेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गेले तीन महिने हा शो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. बिग बॉसने निकाल सांगण्याआधीच प्रेक्षकांनी आपला विजेता ठरवला असल्याचे दिसून आले आहे पण यावेळी विजेता तो नसून ती असणार आहे.

'बिग बॉस मराठी ६'चे प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी भरपूर मतदान करताना दिसत आहेत. त्यामुळे 'बिग बॉस मराठी ६' च्या अंतिम फेरीतील मतदानाचे आकडे पटापट बदलताना दिसत आहेत. लेटेस्ट मतदानानुसार कोणत्या सदस्याने बाजी मारली पाहा. बिग बॉसला आपले टॉप 5 स्पर्धक भेटले आहेत. खेळाच्या सुरुवातीपासूनच हे सदस्य प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

Bigg Boss Marathi 6 Winner
Actress Bought New Home: प्रसिद्ध अभिनेत्रीने वर्सोवामध्ये खरेदी केलं कोट्यवधीचं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल हैराण

'बिग बॉस मराठी ६'चे टॉप 5 स्पर्धक

  • राकेश बापट

  • तन्वी कोलते

  • अनुश्री माने

  • विशाल कोटियन

  • दिपाली सय्यद

Bigg Boss Marathi 6 Winner
Bollywood Couple Pregnant: पुन्हा गोड बातमी! बॉलिवूड स्टार कपलच्या घरी 'बेबी नं. 2'ची चाहूल

'बिग बॉस मराठी ६' चा विजेता कोण?

'बिग बॉस मराठी ६' च्या अंतिम फेरीतील मतदानानुसार, राकेश बापट आणि तन्वी कोलते दोघेही आघाडीवर आहे. तिसऱ्या-चौथ्या स्थानावर अनुश्री माने आणि विशाल कोटियन पाहायला मिळत आहे. तर पाचव्या स्थानावर दिपाली सय्यद आहे. मात्र विजेत्याचे पद राकेश बापटच्या ऐवजी तन्वी कोलते किंवा अनुश्री मानेच्या नावावर होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निकालाआधीच तन्वी कोलते किंवा अनुश्री मानेच्या चाहत्यांनी त्यांनी 'बिग बॉस मराठी ६' च्या विजेता म्हणून घोषित केले आहे. या पाचही स्पर्धकांचा निकाल आज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com