Death News: प्रसिद्ध निर्मात्यावर दु:खाचा डोंगर; अक्षय तृतीयादिवशी जवळच्या व्यक्तीचे निधन

Death News: टी-सीरिज संस्थापक गुलशन कुमार यांचे भाऊ दर्शन कुमार यांचे दिल्लीत निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीतसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
 darshan kumar passes away
darshan kumar passes away Saam tv
Published On

Death News: भारतीय संगीतसृष्टीसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे धाकटे भाऊ दर्शन कुमार यांचे 70 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 18 एप्रिल 2026 रोजी दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण संगीत आणि बॉलिवूड क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

दर्शन कुमार हे जरी प्रकाशझोतात कमी दिसले, तरी त्यांनी टी-सीरिजच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक नवोदित कलाकारांना संधी देणे आणि त्यांना पाठबळ देणे यासाठी ते ओळखले जात होते. त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि मदतनीस या वृत्तीमुळे इंडस्ट्रीमध्ये त्यांना विशेष मान मिळाला होता.

 darshan kumar passes away
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार? 'हा' नाही 'ही' स्पर्धक मारणार बाजी

त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली. प्रसिद्ध गायक मिका सिंगने भावनिक पोस्ट करत दर्शन कुमार यांना आदरांजली वाहिली. 'त्यांनी अनेक गायकांना संधी दिली आणि नेहमीच कलाकारांना पाठिंबा दिला.' असे मिका सिंगने आपल्या सोशल मीडियावर लिहले.

 darshan kumar passes away
Actress Bought New Home: प्रसिद्ध अभिनेत्रीने वर्सोवामध्ये खरेदी केलं कोट्यवधीचं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल हैराण

दर्शन कुमार हे टी-सीरिज परिवारातील महत्त्वाचे सदस्य होते. १९८३ साली गुलशन कुमार यांनी स्थापन केलेल्या या कंपनीने भारतीय संगीत क्षेत्रात मोठी क्रांती घडवली. पुढे ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या म्युझिक लेबल्सपैकी एक बनली. गुलशन कुमार यांचे १९९७ मध्ये दुर्दैवी निधन झाले होते, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ही परंपरा पुढे चालवली. दर्शन कुमार यांनीही या प्रवासात मोलाचे योगदान दिले. दर्शन कुमार यांच्या जाण्याने केवळ टी-सीरिज परिवारालाच नव्हे, तर संपूर्ण संगीतसृष्टीला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com