Lavani Dancer Radha Patil Love Story
Bigg Boss Marathi 6Saam tv

Bigg Boss Marathi 6 : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते राधा मुंबईकर; बिग बॉसच्या घरात दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंड आहे तरी कोण?

Lavani Dancer Radha Patil Love Story : बिग बॉसच्या घरात राधा पाटीलने आपली लव स्टोरी सांगितली आहे. ती बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते.
Published on
Summary

बिग बॉसच्या खेळात राधा पाटील पहिल्या दिवसापासून चांगली सक्रिय दिसते.

घरात राधा आणि अनुश्री माने यांची चांगली मैत्री झाली.

राधाने आपल्या लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल अनुश्रीला सर्वकाही सांगितले.

बिग बॉसच्या घरात नुकताच कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. घराला कॅप्टन्सी पदाचे उमेदवार मिळाले आहेत. आता घराचा कॅप्टन कोण होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बिग बॉसच्या घरात अनेक नाती बनताना आपण पाहतो. काही मैत्रीची तर काही प्रेमाची. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून राधा पाटील आणि अनुश्री माने यांच्यात चांगली मैत्री पाहायला मिळाली. दोघी अनेक वेळा गार्डन एरियात बसून गप्पा मारताना दिसतात. अशाच गप्पा मारताना राधाने अनुश्रीकडे आपल्या वैयक्तिक आयुष्याचा खुलासा केला आहे.

राधा आपल्या बॉयफ्रेंडबद्दल अनुश्रीला सांगते. राधाने सांगितल्यानुसार, ती अनेक वर्ष बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. अनुश्री राधाच्या बॉयफ्रेंडला ओळखते आणि ती त्याची फॅन आहे. राधा आणि तिचा बॉयफ्रेंड 2 BHK मध्ये राहतात. त्यांचा बेडरूम वेगळा आहे आणि बाकी मुलींसाठी वेगळा रूम आहे. राधाच्या बॉयफ्रेंडला कोणतेही व्यसन नाही. त्यांच्या रिलेशनशिपला आता तीन वर्ष झाली आहेत. तो तिच्या विरुद्ध कोणी काही बोल तर अजिबात ऐकून घेत नाही. तो कायम राधाच्या हाताने जेवतो. त्यामुळे तिला बिग बॉसच्या घरात त्याची आठवण येत आहे आणि त्याची काळजी वाटत आहे. राधा म्हणते, "तो अगदी देसी बॉय आहे..."

राधा पुढे म्हणते, "मला शोमध्ये खूप लोक बोलतात, जर येथे तो असता तर कधीच त्यांना मारून निघून गेला असता. आम्ही जेव्हा बाहेर जातो. तेव्हा त्याच्यासोबत फोटो काढायला चाहत्यांची गर्दी होते. लोक त्याच्यासाठी वेडे आहेत. पण त्याने माझा हात कधीच सोडला नाही. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. मी त्याच्यावर चिडचिड, ओरडते पण तो सगळे सहन करतो..." राधा अनुश्रीला बॉयफ्रेंडचे नाव सांगते. मात्र शोमध्ये त्याचा खुलासा होत नाही.

आता राधा पाटीलचा बॉयफ्रेंड कोण? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच बिग बॉसच्या घरात पाच मुलांना मेणाचे दार उघडून 'Power Key' मिळाली आहे. बिग बॉसच्या घरात आता कोणता नवीन राडा होतो पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे.

Lavani Dancer Radha Patil Love Story
Bigg Boss Marathi 6 : टोळीत फूट! रुचिताने थेट 'या' सदस्याला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून दाखवला बाहेरचा रस्ता, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com