'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाणने मामाची मुलगी संजनासोबत लग्नगाठ बांधली.
लग्नानंतर पहिल्यांदाच सूरज चव्हाण सासुरवाडीला पोहचला.
सूरज चव्हाणने हटके अंदाजात बायकोसाठी उखाणा घेतला.
लग्नानंतर पहिल्यांदाच सूरज चव्हाण सासुरवाडीला पोहचला. संजनाच्या माहेरी सूरज आणि संजनाचे धमाकेदार स्वागत झाले. संजनाच्या कुटुंबाने आपल्या लाडक्या जावयासाठी संपूर्ण घर सजवले होते. तेव्हा घरात प्रवेश करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात हटके स्टाइलमध्ये सूरज-संजना एकमेकांचे नाव उखाण्यात घेताना दिसत आहे.
व्हिडीओत पाहू शकता की, नवीन लग्न झालेली जोडी घराच्या उंबरठ्यावर उभे आहेत. घरातील मंडळी सूरज आणि संजनाला उखाणा घेण्यासाठी सांगतात. सूरजने काळ्या रंगाचे ब्लेझर परिधान केले आहे. तर संजनाने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे. दोघे एकत्र खूपच भारी दिसत आहेत. दारात उभे राहून दोघे उखाणा घेतात. जे ऐकल्यावर सर्वजण हसू लागतात आणि टाळ्या वाजवतात.
"नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष? नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष? सूरज राव माझे हसबंड मी त्यांची मिसेस..."
"वन बॉटल, टू ग्लास; संजना माझी फर्स्ट क्लास... "
'बिग बॉस मराठी 5'मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेला अभिनेता सूरज चव्हण 29 नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकला. लग्न सोहळ्यात हळदीपासून ते लग्नापर्यंत सर्व समारंभ थाटामाटात पार पडले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सूरज चव्हाणच्या लग्नात बिग बॉसची किलर गर्ल जान्हवी किल्लेकर दिसली. तिने संपूर्ण लग्न सोहळ्यात सूरज चव्हाणची साथ दिली. जान्हवी सूरजला आपला भाऊ मानते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.