Manasvi Choudhary
बिग बॉस मराठी सीझन ५ सूरज चव्हाण सध्या अनेक कारणामुळे चर्चेत आहे. अत्यंत गरीबीच्या परिस्थितीतून सूरज चव्हाणने त्याची स्वप्ने पूर्ण केली आहेत.
प्रोफेशनलसह पर्सनल लाईफमुळे सूरज चांगलाच चर्चेत राहिला आहे. नुकतंच सूरजचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.
सूरजने त्याची बालपणीची मैत्रिण संजना हिच्यासोबत विवाह केला आहे. हे दोघेही अत्यंत आनंदी आहेत. त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
सूरज चव्हाण हा मूळचा बारामतील मोढवे या गावचा आहे. मोढवे गावातच सूरजने अलिशान बंगला बांधला आहे.
उंच सिलिंग, मॉड्यूलर किचन, गार्डन अश्या अनेक सुविधा सूरजने त्याच्या घरात केल्या आहे.दोन मजली सूरजच्या बंगल्यामध्ये दुसऱ्या मजल्यावर बेडरूम म्हणजेच राहण्याची उत्तम सोय केली आहे.
सूरजला टिकटॉकवरील रिल्सने रातोरात स्टार केले त्यानंतर सूरजला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची संधी मिळाली आणि सूरज चव्हाण बिग बॉस सीझन ५ चा विजेता झाला.