Manasvi Choudhary
कोबी पराठा सोप्या पद्धतीने घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे. अनेकजण कोबीची भाजी खाऊन कंटाळले असतील तर तुम्ही घरीच कोबी पराठा बनवू शकता.
कोबी पराठा बनवण्यासाठी तुम्हाला गव्हाचे पीठ, कोबी, आलं- लसूण पेस्ट, कोथिंबीरी, मीठ, धना पावडर, हळद, हिंग, मसाला, तेल हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी एका भांड्यात कोबी किसून घ्या नंतर त्यात आलं - मिरचीची पेस्ट मिक्स करा.
संपूर्ण मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर, धना पावडर, हळद , हिंग, मसाला आणि मीठ हे मसाले मिक्स कर.
आता हे तयार मिश्रण चांगले एकजीव करून घ्या मिश्रणामध्ये पाणी मिक्स करू नये. नंतर यामध्ये गव्हाचे पीठ मिक्स करा आणि यात थोडेसे तेल मिक्स करून कणिक मळून घ्या.
अशाप्रकारे तयार कणिकचे छोटे गोळे पुरीसारखे लाटून घ्या. गॅसवर पॅनवर तेल लावून घ्या नंतर यावर पराठे भाजून घ्या.
अशाप्रकारे कोबी पराठी घरच्या घरी तयार होईल. दहीसोबत कोबी पराठ्याचा आस्वाद घ्या.