Ghanshyam Darode : छोटा पुढारी सूरज चव्हाणच्या लग्नाला का गेला नाही? वाचा नेमकं कारण

Ghanshyam Darode: बिग बॉसमधील सूरजचा मित्र घनश्याम दरोडे हा सूरजच्या लग्नाला का आला नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
Ghanshyam Darode News
Ghanshyam Darode News
Published On

बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण नुकतंच मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं. सूरजने त्याची बालपणीची मैत्रिण संजना हीच्यासोबत लग्न केलं आहे. दोघेही अत्यंत आनंदी आहेत.सूरजच्या लग्नाला

सोशल मीडियावर सूरजच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सूरजच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील मंडळींसह त्याच्या असंख्य चाहत्यांनी हजेरी लावली. मात्र बिग बॉसमधील सूरजचा मित्र घनश्याम दरोडे हा सूरजच्या लग्नाला का आला नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता.

Ghanshyam Darode News
Mahima Chaudhary Marriage: 52 व्या वर्षी महिमा चौधरीनं उरकलं दुसरं लग्न, लग्नाचे फोटो आले समोर

यावर आता घनश्यामने एक व्हिडीओ शेअर केला आहे. घनश्यामने या व्हिडीओच्या माध्यमातून सूरजच्या लग्नाला का उपस्थित राहू शकलो नाही याविषयी सांगितलं आहे, तो म्हणाला की, मला त्याच्या लग्नाला जायचे होते. पण खरंच सांगतो सध्या माझे दौरे सुरू आहेत. तसेच माझा tv9 मराठीसोबत करार झाला आहे. यामुळे तो शो सोडून मला कुठेही जाता येत नाही.

तीन महिने माझे tv9सोबत टायप असल्याने मला कुठेही जाता येत नाही. जर काही इमर्जन्सी, घरातील महत्वाची कामे असल्यास मला सुट्टी काढता येते. सूरज चव्हाणचे ज्या दिवशी लग्न झाले तेव्हा मी अमरावतीत होते यामुळे तेथून येणं मला शक्य नव्हतं. त्यादिवशी मी टाकलेल्या स्टोरी देखील तुम्ही बघीतल्या असतील. तुम्हाला वाटेल की हे खोटे बोलतात किंवा बनवतात पण आपलं असं काही नाही. त्यामुळे मला कोणीही ट्रोल करू नये.

सूरज चव्हाण हा माझा अत्यंत चांगला मित्र आहे. अनेकजण मला बोलतात सूरज चव्हाणच्या गरीबाच्या लग्नाला तू का गेला नाही. त्यांना मी सांगतो, सूरज चव्हाण एक निरागस व्यक्तीमत्व आहे. त्या भावाच्या मागे आमच्या शुभेच्छा कायम असतील. लवकरच निवडणुका झाल्या की मी १०० टक्के त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेणार असल्याचं घनश्यामने सांगितलं आहे.

Ghanshyam Darode News
Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९'च्या विजेत्याला ट्रॉफीसह किती रक्कम मिळणार? टॉप ३ मध्ये 'या' नावांची चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com