Suraj Chavan-Jahnavi Killekar : वेड्या बहिणीची वेडी माया...; जान्हवीनं सूरजला आशीर्वादाच्या रुपात दिली 'ही' खास भेट, पाहून सगळेच थक्क

Suraj Chavan Special Wedding Gift From Jahnavi Killekar : सूरज चव्हाणचा थाटात लग्न सोहळा पार पडला आहे. सूरजला लग्नात जान्हवी किल्लेकरने खूप खास गिफ्ट दिलं आहे.
Suraj Chavan Special Wedding Gift From Jahnavi Killekar
Suraj Chavan-Jahnavi Killekarsaam tv
Published On
Summary

'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण लग्न बंधनात अडकला आहे.

सूरजला जान्हवी किल्लेकरने लग्नाचे खूप खास गिफ्ट दिलं आहे.

सूरजने मामाच्या मुलीसोबत लग्न केले आहे.

'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan Wedding) थाटामाटात पार पडले आहे. गुलीगत किंगने मामाची मुलगी संजनासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा शाही विवाह सोहळा माऊली गार्डन हॉलवर पार पडला. हे ठिकाण सासवड-जेजुरी रोड, पुरंदर तालुक्यात , पुणे जिल्ह्यात आहे. सूरजच्या लग्नात सुरुवातीपासून त्याची बहीण जान्हवी किल्लेकर खंबीरपणे त्याच्यासोबत उभी होती. 'बिग बॉस मराठी 5'च्या घरात असताना हे सुंदर नाते तयार झाले. जान्हवीने लग्नात सूरजला खूप खास गिफ्ट देखील दिले.

जान्हवी किल्लेकरने सूरज चव्हाणच्या लग्नाचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जान्हवी किल्लेकर सूरजला लग्नाचे खास गिफ्ट देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जान्हवी आनंदाने म्हणते की, फायनली लग्न झालं...त्यानंतर जान्हवी सूरज आणि संजनाची नजर काढते आणि दोघांना मिठी मारते. त्यानंतर जान्हवी सूरजला लग्नाचे स्पेशल गिफ्ट देते. ज्यात सोन्याची अंगठी असते. जान्हवी स्वतः सूरजच्या हातात सोन्याची अंगठी घालते.

जान्हवीने हा व्हिडीओ शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "माझ्या सर्वात खास व्यक्तीसाठी खास भेट..." जान्हवीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत. जान्हवी आणि सूरजचा स्पेशल बॉन्ड नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. जान्हवी किल्लेकरने शेवटपर्यंत सूरजला लग्नात साथ दिली.

सूरज चव्हाणच्या लग्नात बिग बॉसचे अनेक कलाकार पाहायला मिळाले. जान्हवी किल्लेकर हळदी, मेहंदी, साखरपुडा आणि लग्न या सर्व कार्यक्रमात सूरजसोबत होती. जान्हवीचा सूरजच्या लग्नातील लूक खूपच खास होता. तिने निळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. ती लग्नाच्या प्रत्येक समारंभात खूप खास आणि हटके दिसत होती. सोशल मीडियावर तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Suraj Chavan Special Wedding Gift From Jahnavi Killekar
Suraj Chavan - Ankita Walawalkar : लाडक्या भावाच्या लग्नाला बहीण गैरहजर; अंकिताने सूरजसाठी केली खास पोस्ट, दिला सुखी संसाराचा मंत्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com