Manasvi Choudhary
राशीनुसार हातात धातूची अंगठी घालणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जीवनात रत्नांचा धातूंचा परिणाम होतो.
तुमच्या राशीनुसार हाताच्या बोटात कोणत्या धातूची अंगठी घालावी जाणून घ्या.
मेष राशीच्या लोकांनी तांब्याची अंगठी घालणे शुभ असते. ही अंगठी डाव्या हाताच्या अनामिकेत धारण करावी.
वृषभ राशींच्या लोकांनी उजव्या हाताच्या मधल्या बोटात चांदीची अंगठी घालावी.
ज्यांची रास मिथुन आहे त्यांनी हाताच्या करंगळीत पितळेची अंगठी घालावी.
कर्क राशीच्या व्यक्तींनी चांदीची अंगठी घालावी. ही अंगठी सोमवारी घालणं शुभ असते.
सिंह राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी घालणे शुभ असते. ही अंगठी घातल्याने जीवनातील अडचणी कमी होतात.
कन्या राशींच्या लोकांनी बुधवारी सोने आणि चांदी सम प्रमाणात मिसळून तयार झालेली अंगठी घालावी.
या राशीच्या व्यक्तींनी उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये चांदीची अंगठी घालावी.
वृश्चिक राशींनी तांब्याची अंगठी धारण करणे शुभ राहील. रविवारी डाव्या हाताच्या अनामिकेत ही अंगठी घाला.
धनु रास असलेल्या व्यक्तींनी उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये सोन्याची किंवा पितळेची अंगठी घाला. ते घालण्यासाठी गुरुवार हा शुभ दिवस असेल.
शनिवारी डाव्या हाताच्या मधल्या बोटात जस्त किंवा स्टीलची अंगठी घाला. तुम्ही त्याच्या सर्व समस्यांपासून मुक्त व्हाल
कुंभ राशीच्या व्यक्तींनी डाव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घालणे चांगले असेल.
ज्यांची रास मीन असेल अशा व्यक्तींनी उजव्या हाताच्या अनामिकामध्ये पितळेची अंगठी घाला. ही अंगठी घालण्यासाठी गुरुवार हा शुभ दिवस असेल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.