Bigg Boss Marathi Grand Finale: बिग बॉस मधील टास्क क्विनचा प्रवास संपला...९ लाखांचा सुटकेस घेऊन घराबाहेर

Jahnavi Killekar Evicted from Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीचा पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळ्याला सुरूवात झाली आहे. बिग बॉसच्या घरातून जान्हवी किल्लेकर बाहेर पडली आहे.
Janhvi Killekar Real Name
Janhvi Killekar Real NameSaam Tv
Published On

बिग बॉस माराठीच्या ५व्या सिझनच्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांकडून बिग बॉस ५ या सीझनला भरपूर प्रतिसाद मिळालेला दिसतोय. सुरुवाती पासूनच बिग बॉसच्या घरातील सदस्यांसाठी नवीन ट्विस्ट पाहायला मिळाले.

बिग बॉस मराठीच्या ५व्या सिझनला २८ जुलैपासून सुरुवात झाली होती. आज ६ ऑक्टोबरला या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडत आहे. बिग बॉसचा ५वा सीझन १०० दिवसांचा नसून फक्त १०० दिवसांचा होता. बिग बॉसच्या या सीझनमध्ये घरातील सदस्यांनी त्यांच्या हटके स्टाईलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Janhvi Killekar Real Name
Bigg Boss Marathi Grand Finale: ग्रँड फिनालेच्या मंचावर इरिना-वैभवच्या धमाकेदार डान्सचा जलवा

रितेश देशमुख बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री झाली आणि त्यांनी टॉप ६ सदस्यांना अॅक्टिविटी एरियामध्ये येण्यास सांगितले. त्यानंतर ९ लाखांचा सुटकेस घेऊन रितेश भाऊ घरातील कोणत्याही एका सदस्यांला पैसे घेऊन घराच्या बहेर जाण्यास सांगितले आहे. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी प्रतिक्रिया घेतली आहे. त्यानंतर रितेश भाऊंनी सदस्यांच्या समोरचा बजर वाजवायला सांगितला

या दरम्यान जान्हवी किलेलर बजर वाजवण्यास ६व्या क्रमांकावर घराच्या बाहेर पडली आहे. या सीझनमध्ये निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण आणि अंकिता वालावलकर हे टॉप ५ स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फानलिस्ट ठरले आहेत. यामधील कोणता सदस्य नेमकं बाजी मारणार हे पाहाणं रंजक ठरेल.

Edited By: Nirmiti Rasal

Janhvi Killekar Real Name
Bigg Boss 18 : सदावर्ते सलमानसोबत तू तू मैं मैं करणार, चक्क गाढवासोबत बिग बॉसच्या घरात दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com