Bigg Boss 19 : बाई काय हा प्रकार! अशनूर कौरने तान्या मित्तलला टास्क दरम्यान मारले? VIDEO पाहून नेटकरी संतापले

Bigg Boss 19-Ashnoor-Tanya Fight : 'तिकीट टू फिनाले' टास्क दरम्यान अशनूर कौर आणि तान्या मित्तलमध्ये मोठे भांडण होते. अशनूर टास्क दरम्यान तान्याला मारते.
Bigg Boss 19-Ashnoor-Tanya Fight
Bigg Boss 19 saam tv
Published On
Summary

'बिग बॉस 19' चा खेळ शेवटच्या टप्प्यावर आला आहे.

'बिग बॉस 19' च्या घरात 'तिकीट टू फिनाले' टास्क रंगला आहे.

टास्क दरम्यान अशनूर कौर तान्या मित्तलला मारते.

'बिग बॉस 19'च्या घरात सध्या 'तिकीट टू फिनाले' टास्क रंगला आहे. बिग बॉसने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तान्या मित्तल आणि अशनूर कौर यांच्यात टास्क दरम्यान मोठे भांडण होते. अशनूर कौर तान्या मित्तलला मारते. त्यांच्यातील वाद शारीरिक हाणामारीत रूपांतरित होतो, ज्यामुळे घरातील सदस्यांना देखील मोठा धक्का बसतो. तर सोशल मीडियावर अशनूरवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

'तिकीट टू फिनाले'ले मध्ये अशनूर तान्याला मारते. पण अशनूरचे म्हणणे आहे की, ते चुकून लागते. मात्र सोशल मीडियावर अशनूरने हे जाणूनबुजून केल्याचे बोले जात आहे. फरहाना भट्ट, गौरव खन्ना, अशनूर कौर आणि प्रणित मोरे 'तिकीट टू फिनाले' टास्कच्या दुसऱ्या फेरीत पोहोचले. त्यानंतर त्यांपैकी फक्त एकालाच अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.

'तिकीट टू फिनाले' टास्क दरम्यान तान्या मित्तल आणि अशनूर कौर यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळाला. इतकेच नाही तर दोघांमध्ये हाणामारी देखील झाली. प्रोमोची सुरुवात तान्या अशनूरला सांगते की, "संपूर्ण भारत तुझे खरे रंग पाहत आहे. " अशनूर उत्तर देते, "खोट्या गोष्टी नंतर सांग." त्यानंतर तान्या म्हणते, "मला मारल्यानंतर तू सॉरी म्हटले नाहीस." अशनूर उत्तर देते, "माझ्याशी जे काही वागलीस त्यानंतर तू कधी सॉरी म्हटलेस का?" दोघांमधील या संभाषणादरम्यान टास्कची झलक दिसून आली.

अशनूर कौर 'तिकीट टू फिनाले' टास्क जिंकण्यासाठी तिच्या खांद्यावर लाकडी फळी घेते. ज्यात दोन्ही बाजूला पाणी असते. तान्या लाकडी फळीला जोडलेल्या पाण्याच्या भांड्यात छेडछाड करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे अशनूर खांद्यावरची फळी काढून तान्याला मारताना दिसते. त्यानंतर अशनूर म्हणते, "माफ कर, मी तुला पाहिले नाही." मग तान्या म्हणते, "जर तू मला असे मारलेस तर कोणीही तुझा आदर करणार नाही." हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही नेटकरी अशनूरने जाणूनबुजून केल्याचे म्हणत आहेत. तर काही तिचा चुकून धक्का लागल्याचे बोलत आहेत.

Bigg Boss 19-Ashnoor-Tanya Fight
Indrayani : 'इंद्रायणी'च्या आयुष्यात नवं वादळ; कसा उधळणार श्रीकलाचे कपटी डाव? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com