Bigg Boss 19-Kunickaa : "कोणताही पश्चात्ताप नाही..."; कुनिका कुमार सानूसोबतच्या नात्याबद्दल काय म्हणाली?

Kunickaa Sadanand Talk On Affair With Kumar Sanu : 'बिग बॉस 19' मधून बाहेर पडल्यानंतर कुनिकाने कुमार सानूसोबतच्या अफेअरबद्दल आपले स्पष्ट मत मांडले आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
Kunickaa Sadanand Talk On Affair With Kumar Sanu
Bigg Boss 19-KunickaaSAAM TV
Published On
Summary

'बिग बॉस 19' मधून कुनिका सदानंदची एक्झिट झाली आहे.

'बिग बॉस 19'मध्ये असताना कुनिका आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत होती.

कुनिकाने कुमार सानूसोबतच्या अफेअरबद्दल स्पष्ट मत मांडले आहे.

'बिग बॉस 19' ची स्पर्धक कुनिका सदानंद गेल्या आठवड्यात घरातून बाहेर पडली. त्यानंतर तिने अनेक मीडिया मुलाखती दिल्या आहेत. ज्यात तिने कुमार सानू यांच्यासोबतच्या रिलेशनशिपवर आपले स्पष्ट मत मांडले आहे. बिग बॉसच्या घरात असताना कुनिका सदानंद आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आली आहे. बिग बॉसच्या घरातील कुनिकाचा गेम चाहत्यांना खूप आवडला.

एका मिडिया मुलाखतीत कुनिका सदानंद म्हणाली की, "मी नीलम, गौरव किंवा फरहानाशी बोलताना माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सहज बोलून गेले. कारण मला त्यांना सांगायचे होते की, जास्त अपेक्षा करू नका. लोकांना खूश करण्यात गुंतू नका. मी जेव्हा भूतकाळातील नात्यांबद्दल विचार करते. तेव्हा मला वाईट वाटते. माझी इच्छा आहे की ते माझ्यासोबत असावे."

कुनिका पुढे म्हणाली की, "मी कोणाचाही संसार मोडला नाही. त्यांच्या लग्नात अडचणी होत्या. माझ्या मनात त्यांच्या मुलांबद्दल प्रेम आहे. मला सर्व मुलं आवडतात. जान जेव्हा बिग बॉसमध्ये होता, मी एपिसोड पाहिले आहेत. तेव्हा कुमार सानूने मुलाला चांगला पाठिंबा दिला. मात्र जान त्याच्याबद्दल वाईट बोलला. आम्ही मुलांना दुखावले."

शेवटी कुनिका म्हणाली, "मला माझ्या आयुष्यात काहीही पश्चात्ताप नाही. जर आज मला हृदयविकाराचा झटका आला तर मला फक्त माझ्या धाकट्या मुलाचे लग्न किंवा त्याच्या यशाचे साक्षीदार न होण्याचा पश्चात्ताप होईल. बाकी कोणताही पश्चात्ताप नाही. मी आयुष्यात ज्या मार्गांनी गेले ते माझ्यासाठी योग्य होते."

Kunickaa Sadanand Talk On Affair With Kumar Sanu
Dharmendra-Ahana Deol : अहाना देओलला धर्मेंद्र यांच्या मालमत्तेतून काय काय हवे? स्वतः केला खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com