प्रणित मोरे 'बिग बॉस १९'च्या गेममध्ये 'टॉप 3'मध्ये पोहचला.
घरात असताना प्रणित मोरे आणि मालती चाहरचे भांडण झाले.
प्रणित मोरे भांडण झाल्यावर मालतीला सॉरी देखील म्हणाला.
'बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले पार पडला आहे. 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी गौरव खन्नाने उचलली आहे. तर महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरे दुसरा रन-रप आला आहे. प्रणितला अवघ्या महाराष्ट्राने खूप पाठिंबा आणि प्रेम दिले. 'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19-Pranit More) घरात असतानाही त्याचा स्पष्टवक्तेपणा प्रेक्षकांना खूप आवडला. त्याचा गेम कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहील. 'बिग बॉस 19'च्या घरात असताना प्रणितची काही सदस्यांसोबत चांगली मैत्री झाली. यात अशनूर कौर आणि मालती चाहरचे नाव येते.
'बिग बॉस 19'च्या शेवटच्या टप्प्यात मालती चाहर आणि प्रणित मोरे चांगले मित्र बनताना दिसले. त्यांचे क्यूट व्हिडीओ कायम व्हायरल होत असायचे. प्रणित मालतीची खूप काळजी घ्यायचा. दोघे एकत्र चांगला वेळ घालवायचे. मात्र ज्या दिवशी मालती चाहर बिग बॉसच्या घरातून बाहरे पडली. त्याच दिवशी मालती चाहर आणि प्रणित मोरे यांच्यात वाद झाला. त्यामुळे ती प्रणितला बाय न बोलताच घराच्या बाहेर पडली. या गोष्टीने प्रणित खूप दुखावला गेला आणि रडला.
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर प्रणितने दिलेल्या मीडिया मुलाखतीत तो मालतीसोबतच्या भांडणावर म्हणाला, "आम्ही जोक करत होतो. तेव्हा तिने मला मारले. त्यानंतर माझ्याकडून तिला चुकून लागले. मी त्यासाठी मालतीला सॉरी देखील बोलो. पण नंतर ती न बोलता बाहेर पडली. आम्ही ते भांडण मिटवू शकलो नाही. बोलता आले नाही. त्यामुळे भांडण खूप पुढे गेले. थोडं जास्त झालं" प्रणित मोरेला 'बिग बॉस 19' च्या घरातून बाहेर पडल्यानंतर तो मालतीला भेटेल का असे विचारले असता, तो म्हणाला, "मी तिला नक्कीच भेटेन. मी अजूनही तिला माझा चांगली मैत्रिण मानतो. जर तिला माझ्यामुळे वाईट वाटले असेल आणि ती माझी मैत्रीण आहे तर मी तिच्याशी नक्कीच बोलेन. मी माफी मागेन आणि तिला पटवून देईन, की मी हे जाणून बुजून नाही केले."
प्रणित आणि मालती जेवण बनवत होते. तर गौरव प्रणितला सल्ले देत होता. जे प्रणित ऐकत होता. हे पाहून मालती प्रणितला ओरडते. मात्र प्रणिच त्यावर काही बोलत नाही. त्यानंतर प्रणित आणि जीके मस्ती करत असतात. तेव्हा प्रणित गंमतीत म्हणतो की, "मालतीला घरी पाठवा..."तेव्हा मालती त्याला गंमतीने मारते. प्रणितही तिला लाथ मारतो. त्यावर मालती त्याला 'मूर्ख' बोलते आणि त्यांच्यात भांडणे होतात. बाहेर आल्यावर मीडिया मुलाखतीत मालतीने सांगितले की, प्रणितने मस्करीत मला लाथ मारली...पण ती माझ्या हिपवर बसली. ज्याचा मला खूप त्रास झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.