Bigg Boss Marathi: अरबाजची लिझा 'सर्वात मोठी ड्रामा क्वीन' Splitsvillaमधील मॉडलने केला मोठा खुलासा म्हणाली....

Bigg Boss Marathi Arbaz Patel and Leeza Relationship : बिग बॉस मराठीमध्ये पहिल्याच दिवसापासून अरबाज निक्कीच्या अफेरची चर्चा सुरु आहे. अशातच अरबाजच्या रुमर्ड EX गर्लफ्रेंडने मोठा खुलासा केला आहे.
Bigg Boss Marathi Arbaz Patel and Leeza Relationship
Bigg Boss Marathicanva
Published On

बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये पहिल्याच दिवसापासून अरबाज पटेल आणि निक्की तांबेळी यांच्यामध्ये प्रेमाचे वारे वाहताना पाहायला मिळाले होते. पण काही आठवड्यानंतर दोघांच्या नात्यामध्ये दूरावा निर्माण झाला होता. त्याचं कारणं म्हणजे बिग बॉसने निक्की आणि अभिजितचा ग्रुप बनवला होता, ज्यामुळे निक्की आणि अरबाजमध्ये जबरदस्त राडा पाहायला मिळाला होता. परंतु काही काळानंतर दोघे पुन्हा एकमेकांशी बोलू लागले. दोघांमधील मैत्रीचं नातं आणखी घट्ट झालं आणि त्यांच्यातील केमिस्ट्री पाहून त्यांच्या अफेरची चर्चा सुरू झाली.

यादरम्यान अरबाज पटेलच्या कथित गर्लफ्रेंड लिझा बिंद्राच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. लिझा तिच्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अरबाज बिग बॉसमध्ये गेल्यापासून लिझा तिच्या इन्स्टाग्रामवर अरबाज आणि तिच्या नात्याबद्दल पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी तिनं ब्रेकअपचे फोटो पोस्ट केले होते. ज्यामळे तिच्या नात्यामध्ये फुट पडली की काय असं नेटकऱ्यांना वाटतं होतं.

मात्र लिझाने तिच्या आणि अरबाजच्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे तिनं तिच्या सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. परंतु आता अरबाजची गर्लफ्रेंड प्रेंगनेंट असल्याची सर्वत्र चर्चा सुरू झालीय. अरबाजन बिग बॉसपूर्वी Splitsvilla या रियालिटी शोमध्ये दिसला होता तिथे त्याचं नाव नायरा अहुजा हिच्या जोडले गेले होते. मात्र काही कारणांमुळे दोघांच्या नात्य़ामध्ये दूरावा निर्माण झाला होता. नायराने एका मुलाखाती दरम्यान अरबाजबद्दल काही खुलासे केले. तिनं सांगितलं की, "अरबाज आता निक्कीसोबत करतोय त्याने ते यापूर्वी माझ्यासोबत केले होते. त्याला असं वाटतं की ज्या मुलीवर त्याची नजर पडेल ती मुलगी त्याची होईल. मग तो त्या मुलीबद्दल पोझेसिव्ह होऊ लागतो".

Bigg Boss Marathi Arbaz Patel and Leeza Relationship
Bigg Boss Marathi: आमचं ठरलंय! आमचं कधीच ब्रेकअप झालं नाही, अरबाजसोबतच लग्न करणार, निक्कीसोबतच्या चर्चा लिझाने एका झटक्यात संपवल्या!

अरबाज आणि त्याच्या गर्लफ्रेडबद्दल बोलतांना नायरा म्हणाली की, "अरबाज लिझाला घेऊन खुपच पोझेसिव्ह आहे. त्याने तिचं आयुष्य कंट्रोल केलंय. तो तिला काम करून देत नाही कुठे जाऊ देत नाही." त्यानंतर लिझाबद्दल बोलतांना नायरा बोलते की, लिझा एक नंबरची ड्रामा क्विन आहे. कधी अरबाजचं प्रेम प्रकरण गेम प्लॅन असल्याचं सांगते. तर कधी अरबाजला चुकीचं ठरवते. कधी ती अरबाजची गर्लफ्रेंड असल्याचा दावा करते, तर कधी त्याच्यासोबत लग्न झाल्याच्या बातम्या पसरवते". मला काही दिवसांपासून मेसेज येत आहेत, त्यामध्ये असं सांगण्यात येतय की लिझा प्रेग्नेंट आहे. परंतु या गोष्टींमध्ये तथ्य नसल्याचं नायराने म्हटलंय. अरबाज मला आणि निक्कीला मुर्ख बनवतोय, असं देखील तिनं म्हटले आहे.

Edited By: Nirmiti Rasal

Bigg Boss Marathi Arbaz Patel and Leeza Relationship
Bigg Boss Marathi : शंभर टक्के इंटेशनल होत...भाऊने आर्याला झापलं, बिग बॉस अंतिम निर्णय काय घेणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com