

नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ येथे काजल राघवानी यांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला.
शोरूम उद्घाटनासाठी अभिनेत्री आल्या असताना त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
गोंधळादरम्यान फॉर्च्युनरच्या खिडकीची काच फुटल्याचे वृत्त
बिहारच्या नालंदा जिल्ह्यात भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानीच्या गाडीवर हल्ला झालाय. हाती आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री काजल एका शोरूमच्या उद्घाटनासाठी बिहार शरीफ येथे आली होती. या अभिनेत्रीची झलक पाहण्यासाठी जमलेला जमाव अनियंत्रित झाला. या गोंधळादरम्यान, जमावाने तिच्या गाडीवर हल्ला केला. लोकांनी तिच्या 'फॉर्च्युनर' कारच्या खिडकीची काच फोडली.
घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असूनही काजल राघवानी यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या एका अनियंत्रित जमावाने गाडीवर हात आणि विटांनी हल्ला केला. ज्यामुळे गाडीची खिडकी फुटली. मात्र, शोरूम व्यवस्थापकाच्या प्रसंगावधानामुळे काजल राघवानी यांना सुरक्षितपणे तिथून बाहेर काढण्यात यश आले; त्या बाहेर येताच चालकाने गाडी वेगाने त्या भागातून बाहेर नेली.
काजल राघवानी यांच्यासोबत असलेल्या बाउन्सरनी सांगितले की, पाटण्याहून १२-१३ बाउन्सर आलेले असूनही गर्दी प्रचंड होती. त्यामुळे अभिनेत्रीला सुरक्षा कडे तयार करून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. आणखी एका बाउन्सरने गर्दीच्या प्रचंड प्रमाणाचा उल्लेख करत सांगितले की, मागील दरवाजातून त्यांना बाहेर काढताना खूप कसरत करावी लागली, कारण बाहेर त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.