Ketaki Mategaonkar : "ठाई ठाई विठ्ठल..."; केतकी माटेगांवकरचं नवीन गाणं, विठ्ठल भक्तीत व्हाल दंग

Ashadhi Ekadashi 2025 : सध्या सर्वत्र वारीचा उत्सव पाहायला मिळत आहे. अशात मराठी गायिका केतकी माटेगांवकरचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. जे विठ्ठल भक्तीवर आधारित आहे.
Ashadhi Ekadashi 2025
Ketaki MategaonkarSAAM TV
Published On

मराठमोळी गायिका केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) कायम आपल्या गाण्यामुळे चर्चेत असते. तिचा मधुर आवाजाचे लाखो चाहते दिवाने आहेत. आपल्या गोड आवाजाने ती कायच प्रेक्षकांना भुरळ घालते. तिने आजवर अनेक मराठी गाणी लिहिली आहेत. नुकतेच तिचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात विठ्ठल भक्ती पाहायला मिळत आहे.

मराठी गायिका केतकी माटेगांवकर हिचे नुकतेच एक सुंदर गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. विठ्ठल भक्तीवर आधारित "ठाई ठाई विठ्ठल" (Thai Thai Vitthal) हे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे केतकीसोबत गायक अवधूत गांधी यांनी देखील गायले आहे. "ठाई ठाई विठ्ठल" या गाण्याला सुहित अभ्यंकर ह्यांनी संगीतबद्ध केले आहे. तर अक्षयराजे शिंदे ह्यांनी हे गाणे लिहिलं आहे.

गाण्यातील प्रत्येक ओळ भक्तांना मंत्रमुग्ध करून टाकते. विठ्ठल माउलींच्या ह्या गाण्यातून एक नवा विचार मांडण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. माणसाच्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात आणि जातात. आयुष्याच्या प्रवासात विठू माऊली अनेक रूपात आपल्याला दर्शन देतात. शेतकऱ्याला पावसाच्या रूपात, रुग्णाला डॉक्टरच्या रूपात, लेकरला आईच्या रूपात आणि मावळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात दर्शन देतात. या गाण्याचे गीतकार अक्षयराजे शिंदे आणि संगीतकार सुहित अभ्यंकर आहेत. ते म्हणतात की, "आम्हाला सर्वांना आमचा विठ्ठल गाण्याच्या स्वरूपात भेटला आहे."

वर्कफ्रंट

केतकी माटेगावकरने आजवर गाण्यासोबत अनेक दमदार चित्रपट केले आहेत. 'टाईमपास' चित्रपटातून केतकीला खूप लोकप्रियता मिळाली. चित्रपटातील दगडू आणि प्राजूची जोडी आजही चाहत्यांच्या मनावर घर करून आहे. या चित्रपटात केतकी माटेगावकरसोबत अभिनेता प्रथमेश परब पाहायला मिळाला. यासोबतच केतकी माटेगावकर तानी, शाळा, काकस्पर्श' या चित्रपटांत दिसली. मालिकांसाठी केतकीने पार्श्वगायन देखील केले आहे.

Ashadhi Ekadashi 2025
Pinga Ga Pori Pinga : वल्लरीच्या सासूबाईंनी पिंगा गर्ल्सना दिलं चॅलेंज, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com