Saang Aai : आई आणि मुलीचं नातं हे अतूट, भावनिक आणि नेहमीच थोडं वेगळं असतं. या नात्यात गोडवा असतो, तर कधी रुसवे-फुगवेही. मुलगी नेहमीच आपल्या आईचं अनुकरण करत असते. तिचं वागणं बोलणं, घराची काळजी घेणं आणि कधी आई घरी नसली तर तिच्या जागी आईसारखं वागण्याचा प्रयत्न करणं. हे सगळं एका सुरेल गाण्यातून उलगडलं आहे. ‘सांग आई’ हे अवधूत गुप्ते यांचं नवीन गाणं संगीतप्रेमींसाठी नुकतंच प्रदर्शित झालं आहे.
आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारं हे गाणं त्यांच्या ‘आई’ या अल्बममधील अखेरचं गाणं आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या गाण्याचं संगीत अवधूत गुप्ते यांचं असून, अर्थपूर्ण शब्द प्रशांत मडपुवार यांनी लिहिले आहेत. या हृदयस्पर्शी गाण्याचं संगीत संयोजन अनुराग गोडबोले यांनी केलं आहे. 'सांग आई'चं दिग्दर्शन शोनील यलट्टीकर यांनी केलं असून, यात पूर्णिमा डे आणि मायरा स्वप्नील जोशी मायलेकीच्या भूमिकेत दिसत आहेत.
या गाण्याच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांची मुलगी मायरा जोशी हिने मनोरंजन क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. वडिलांकडून अभिनयाचा वारसा लाभलेल्या मायराने आपल्या पहिल्याच कामात संवेदनशील अभिनय सादर करून रसिकांचे लक्ष वेधले आहे. तिचा चेहर्यावरचा भाव, सहज अभिनय, आणि आई-मुलीच्या बंधाचा उत्कट भाव मांडण्याची पद्धत खरोखर कौतुकास्पद आहे.
'सांग आई'बद्दल भावना व्यक्त करताना अवधूत गुप्ते म्हणतात, “आई-मुलीचं नातं बघताना मला अनेक भावनिक क्षण आठवतात. ‘सांग आई’ हे गाणं माझ्या मनापासून आलं आहे. स्वप्नील जोशीची मुलगी मायरा हिला या गाण्यात घेण्यामागचं कारणही भावनिक आहे. मायरा ही गाण्यासाठी योग्य निवड होती कारण तिच्या डोळ्यांत गोड भाव आहे आणि ती नैसर्गिक अभिनय करते. स्वप्नील हा केवळ माझा चांगला अभिनेता नाही, तर एक संवेदनशील वडीलही आहे. मायरा त्याच्याच गुणांचा वारसा घेऊन आली आहे. त्यामुळे ‘सांग आई’ साठी ती परिपूर्ण होती. आईचं अनुकरण करताना मुलीमध्ये निर्माण होणारी ती भावना, ती साद घालायचा मी प्रयत्न केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.