The Traitors: राज कुंद्रासह तिघांची पहिल्याच दिवशी शोमधून एक्झिट; या स्पर्धकांनी रचला सापळा

The Traitors Show: 'द ट्रेटर्स' हा रिअॅलिटी शो सुरू झाला आहे आणि पहिल्याच एपिसोडपासून त्याने खूप चर्चा निर्माण केली आहे आणि सर्वांना धक्का दिला आहे.
The Traitors Trailer
The Traitors TrailerSaam Tv
Published On

The Traitors Show: 'द ट्रेटर्स' हा रिअॅलिटी शो सुरू झाला आहे आणि पहिल्याच एपिसोडपासून त्याने खूप चर्चा निर्माण केली आहे आणि सर्वांना धक्का दिला आहे. कारण निर्मात्यांनी १२ जून रोजी 'द ट्रेटर्स'चे तीन एपिसोड रिलीज केले होते आणि त्यात एक ट्विस्ट दिसला होता, यामुळे सर्व प्रेक्षकांना धक्का बसला होता. एकाच वेळी चार स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले होते, म्हणजेच शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासह तीन स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले होते.

धक्कादायक ट्विस्टशिवाय, 'द ट्रेटर्स'मध्ये फसवणूक आणि विश्वासघाताचा एक जबरदस्त डोस पाहायला मिळणार आहे, जो प्रेक्षकांना थक्क करणारा असेल. पहिल्या तीन एपिसोडमध्ये, स्पर्धकांनी त्यांच्याच मित्रांच्या पाठीत 'वार' केले आणि त्यांना शोमधून बाहेर काढले आहे.

The Traitors Trailer
Housefull 5 Box Office Collection: 'हाउसफुल 5' च्या कमाईला ब्रेक लागायला सुरुवात; सातव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केला इतक्या कोटींचा गल्ला

'द ट्रेटर्स' मधून या ४ सेलिब्रिटी स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले.

'द ट्रेटर्स' मधून बाहेर काढण्यात आलेल्या सेलिब्रिटी स्पर्धकांमध्ये राज कुंद्रा, करण कुंद्रा, साहिल सलाथिया आणि लक्ष्मी मंचू यांचा समावेश आहे. साहिलला आधी बाहेर काढण्यात आले. त्याला राज कुंद्रा, एलनाज नौरोजी आणि पुरव झा यांनी बाहेर काढले. साहिल सलाथिया हा या तिघांसाठी सोपा टार्गेट होता आणि म्हणूनच त्यांनी पहिल्या एलिमिनेशन फेरीतच त्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.

The Traitors Trailer
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे सलमान खानसह 'या' सेलिब्रिटींनी केली मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाले...

राज कुंद्राला बाहेर काढण्यात आले, अपूर्व मखीजाने रचला सापळा

राज कुंद्राला दुसऱ्या क्रमांकावर बाहेर काढण्यात आले, जे धक्कादायक होते कारण तो तीन गद्दारांपैकी एक होता. राउंड टेबलमध्ये, स्पर्धकांना गद्दार कोण आहे हे शोधायचे होते. अपूर्व मखीजाने सांगितले की राज कुंद्रा हा गद्दार आहे. ती यावर ठाम राहिली. जेव्हा तिने यासाठी ठोस कारण सांगितले आणि तेव्हा सर्वांनी राज कुंद्राच्या विरोधात मतदान केले आणि त्याला शोमधून बाहेर काढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com