Ahmedabad Plane Crash: १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेल्या Air India Flight AI‑171 (Boeing 787‑8) या विमानाचे उड्डाणानंतर लगेचच अपघात झाले. यात प्रवासी आणि चालक दल एकत्रीत २४२ लोक होते. या भीषण दुर्घटनेच्या शोकात संपूर्ण राष्ट्र आणि मनोरंजन विश्व हादरून गेले आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अनेक हिंदी आणि दक्षिण भारतीय कलाकारांनी त्यांच्या आगामी कार्यक्रम, इव्हेंट्स आणि स्क्रीनिंग्स रद्द केले आहे.
सलमान खान
बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने भारतीय सुपरक्रॉस रेसिंग लीग(ISRL)च्या मुंबईतील प्रेस मीटमध्ये उपस्थित राहिण्याचे नियोजन केले होते, परंतु विमान दुर्घटना पाहून त्याने या प्रेसमीला उपस्थित राहण्याचे रद्द करण्यात आले. सलमान स्पष्टपणे म्हणाला,“देश दु:खात असताना आम्ही आनंदोत्सव साजरा करू शकत नाही.” ISRL संघटनेने देखील या निर्णयामागे “जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने निर्णय घेण्यात आला आहे” असे म्हटले.
अक्षय कुमार
“कन्नप्पा” या अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर इंदोरमध्ये १३ जूनला लाँच होणार होता. या भीषण अपघातामुळे ट्रेलर लॉन्च इव्हेंट पुढे ढकलण्यात आले. विष्णु मांचु (Vishnu Manchu) ‘कन्नप्पा’ ट्रेलर लॉन्चमध्ये सहभागी होणार असताना, त्यांनी देखील तो इव्हेंट रद्द करून पुढे ढकलला असल्याचे सांगितले.
राणा नायडू
राणा नायडू या सिरीजची नेटफ्लिक्स इंडीया कडून मुंबईतील छायत्र सिनेमा थिएटरमध्ये होणार्या सिझन २ च्या स्क्रीनिंगही या तात्पुरती थांबवली गेली. कलाकार राणा दग्गुबाती, सुरवीन चावला, अर्जुन रामपाल आणि क्रिती खरबंदा इत्यादी उपस्थित राहणार होते.
इतर बॉलिवूड स्टार्सच्या प्रतिक्रिया
सलमान खान, अक्षय कुमार, अलीया भट्ट, विक्की कौशल, करण जौहर, सनी देओल, सोनू सूद, पारिणीती चोप्रा, मनोज बाजपेयी, रितेश देशमुख, अजय देवगण यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहे. विक्की कौशल म्हणाले, “मनावर भार वाटत आहे...”
या शोककाळात कलाकारांनी त्यांच्या कार्यक्रमांना विश्रांती देऊन देश व पीडित कुटुंबांसोबत एकजूटीने उभे असल्याचा संदेश दिला आहे. कालांतराने, परिस्थिती स्थिर झाल्यावर या कार्यक्रमांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.