Ahmedabad Plane Crash: गुरुवारी विमानाने उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच भारतात झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात ब्रिटिश वेलनेस इव्हेंट कंपनीचे मालक इन्फ्लुएन्सर जेमी मीक आणि त्यांचे पती फिन यांचा देखील मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. ४५ वर्षीय जेमी मीक आणि त्यांचे ३९ वर्षीय पती फिओंगल ग्रीनलॉ यांनी अपघातापूर्वी विमानाची वाट पाहत विमानतळावर बसलेले स्वतःचे व्हिडिओ पोस्ट केले होता हा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जेमी मीकचा भाऊ निक मीकने डेलीमेल यावृत्तसंस्थेला सांगितले की, अपघातानंतर कुटुंब खूप दुःखी झाले आहे. 'आम्ही आज रात्री त्याची घरी वाट पाहत होतो. तो संध्याकाळी ६.३० वाजता उतरायला हवा होता आणि नंतर आमच्या आईसोबत राहणाऱ्या त्याच्या कुत्र्याला घेऊन जाण्यासाठी सुमारे ११ वाजता येणार होता. तीला बरी नाहीये. सध्या तिच्यासाठी ही बातमी खूप वाईट आहे आणि आम्हाला ही बातमी काही तासांपूर्वीच कळली," निक म्हणाला.
निकने खुलासा केला की जेमी आणि त्याचा पती एका वेलनेस रिट्रीटमध्ये सहभागी होण्यासाठी १० दिवसांसाठी भारतात होते. जेमी मीकची भारत येण्याची ही पहिल भेट नव्हती पण, पती फिनसोबत तो पहिल्यांदाच भारतात गेला होता असे निक म्हणाला, तो म्हणाला की जेमी आणि फिन यांनी २०२२ मध्ये लग्न केले होते आणि ते केंटमधील रॅम्सगेट येथे राहत होते.
'आम्ही विमानतळावर आलो आहोत...'
"'आम्ही विमानतळावर आलो आहोत, आता विमानात चढत आहेत. गुडबाय इंडिया. इंग्लंडला परतण्यासाठी दहा तासांची फ्लाईट आहे आणि आम्हाला इतर प्रवासी धावताना दिसत होते.फिनने यावेळी जेमीला विचारले तुझे या ट्रिपसाठी कॉन्ट्रोब्यूशन काय यावर फिनचं हसत म्हणाला तु मला इथे घेऊन आला आहेस.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.