Arjun Kapoor Birthday Party Video: अर्जुन कपूरच्या बर्थ डे पार्टीत मलायकाचा बेभान डान्स; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

Malaika Arora Viral Video: अर्जुन कपूरच्या वाढदिवासाच्या पार्टीमध्ये मलायकाने केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Malaika Arora Dance Viral Video
Malaika Arora Dance Viral VideoInstagram

Malaika Arora Dance Viral Video: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरचा ३८ वा वाढदिवस. अर्जुन नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अर्जुन कपूरच्या वाढदिवासाच्या पार्टीमध्ये मलायकाने केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Malaika Arora Dance Viral Video
Prithviraj Sukumaran Accident : सुप्रसिद्ध साऊथ स्टारचा गंभीर अपघात ; लवकरच शस्त्रक्रिया

अर्जुन कपूर आणि गर्लफ्रेंड मलायका नेहमीच चर्चेत असतात. यातच अर्जुन कपूरच्या बर्थ डे पार्टीमध्ये मलायकाने केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी रात्री अर्जुन कपूरच्या घरी त्याच्या प्री बर्थ डे पार्टीचं आयोजन केलं होतं.

या पार्टीला त्याची गर्लफ्रेंड मलायका, बहीण अंशुला कपूर आणि खुशी कपूर उपस्थित होत्या. या बर्थ डे पार्टीतील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बर्थ डे पार्टीमधील मलायकाच्या डान्सने सर्वांचंच लक्ष वेधले आहे.

मलायकाचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पार्टीला मलायकाने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला आहे. त्यावर लाल रंगाचे हर्ट शेपचे दिल आहे. व्हिडिओत मलायका तिच्याच 'छैया छैया' गाण्यावर डान्स करत आहे. मलायका अगदी बेभान होऊन डान्स करताना दिसत आहे.

मलायकाच्या या डान्सवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मलायकाच्या या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली आहे की,'यामुळेच वहिनी प्रत्येक मुलाला आवडते'.तर आणखी एकाने लिहलयं की,'वाटतयं की पार्टीमध्ये दारु जास्त झालीये'.

तर अजून एकाने लिहलय की,'५० वर्षापासून दोनच गाण्यांवर डान्स करतेय,एक म्हणजे 'मुन्नी बदनाम हुई' आणि 'छैया छैया'.तर काही लोकांनी मात्र मलायकाच कौतुक केलं आहे.'ती तिच्या आयुष्याच खुश आहे तर तुम्ही लोक का क्रिटियाइज करत आहात'.असं एकाने म्हटलं आहे.

Malaika Arora Dance Viral Video
Kushal Badrike Post: ‘पहिल्या पावसात भिजायला...’ भर पावसात कुशलला बायकोची आठवण

अर्जुन कपूरच्या या बर्थ डे पार्टीत बहिण अंशुला कपूर आणि खुशी कपूरही होत्या.यावेळी अंशुलाचा बॉयफ्रेंडही पार्टीला उपस्थित होता. या पार्टीचे काही फोटोस त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com