Kushal Badrike Post: ‘पहिल्या पावसात भिजायला...’ भर पावसात कुशलला बायकोची आठवण

Kushal Badrike 1st Rain Romantic Post On Wife: कुशलच्या एका रोमँटिक पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
Kushal Badrike 1st Rain Romantic Post On Wife
Kushal Badrike 1st Rain Romantic Post On WifeInstagram

Kushal Badrike Special Post For Wife: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशल बद्रिके नेहमीच आपल्या उत्तम विनोद कौशल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. विनोदासाठी अचूक टायमिंगसाठी त्याची सर्वत्र ओळख आहे. या खास शैलीमुळे कुशलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सध्या महाराष्ट्रासह सर्वत्र पावसाने हजेरी लावली. नुकतीच कुशलच्या एका रोमँटिक पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले. पहिल्या पावसावर कुशलने रोमँटिक अंदाजात खास पोस्ट लिहिली आहे.

Kushal Badrike 1st Rain Romantic Post On Wife
Jawan Teaser: बाबो! शाहरूखने ‘जवान’साठी केलंय टक्कल, लूक पाहताच चाहत्यांनी विचारले भन्नाट प्रश्न, किंग खान म्हणाला...

कुशल नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या विनोदाच्या अचूक पंचमुळे सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या देखील बरीच आहे. नुकतीच त्याने एक पोस्ट लिहिली आहे. तो पोस्टमध्ये म्हणतो, “आता पहिल्या पावसात भिजायला जात नाही मी, कोसळू देतो त्याला तुझ्या आठवांसारखा. मात्र मनमोकळा श्वास घेतो भिजल्या मातीचा… तुझ्या केसांसारखा….(सुकुन)”

त्याच्या या रोमँटिक पोस्टवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एकाने कुशलची कविता पाहून लय भारी अशी कमेंट केली. तर आणखी एकाने तुझी कविता काळीज चिरतात. अशी कमेंट केली. तर आणखी एकाने हृदयस्पर्शी अशी कमेंट केली. तर काहींनी त्याच्या कविता पाहून जुने दिवस आठवल्याची भावना सांगितली.

Kushal Badrike 1st Rain Romantic Post On Wife
Shah Rukh Khan On PM Modi's Welcome : मला जर ट्रेन नेण्याची परवानगी असती तर... मोदींच्या व्हाईट हाऊस स्वागतावर शाहरुखची प्रतिक्रिया

कुशलची पत्नी सुनयना गेल्या काही दिवसांपूर्वी परदेशात गेली होती. परदेशात ती ‘मुघल-ए-आझम’ या म्युझिकल शोसाठी गेली होती. कुशल नेहमीच त्याच्या बायको सुनयनावर जीवापाड प्रेम करतो. लाडक्या बायकोसाठी कुशलने तिच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com