Bigg Boss Marathi : अरबाजच्या संतापाचा भडका; निक्कीने दिला पुन्हा धोका, कॅप्टन्सी टास्क चांगलाच रंगला

Arbaz Angry On Nikki : बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा राडा पाहायला मिळणार आहे. अरबाज आणि निक्कीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे.
Arbaz Angry On Nikki
Bigg Boss MarathiSAAM TV
Published On

'बिग बॉस'च्या (Bigg Boss Marathi) घरात कॅप्टन्सी टास्कवरून नवीन राडा पाहायला मिळणार आहे. घरात अरबाजचे रौद्ररूप पाहायला दिसणार आहे. निक्की स्वतः चा गेम प्लान करणार आहे. जो अरबाजला मुळीच पटत नाही. ज्यामुळे निक्की आणि अरबाजमध्ये कडाक्याचे भांडण होते.

नव्या कॅप्टन्सी टास्कमध्ये पाहायला मिळेल की, कॅप्टनसी (Captaincy Task) मध्ये अंड मिळवून कॅप्टनसीच्या शर्यतीतून ज्या सदस्याला आपल्याला बाहेर काढायचे आहे त्याच्या नावाच्या घरट्यात अंडे टाकायचे आहे. या टास्क दरम्यान दोन ग्रुप पाडण्यात आले आहेत. टीम ए मध्ये अरबाज, वर्षाताई, सूरज, डीपीदादा आणि निक्की खेळणार आहेत तर टीम बी मधून अंकिता, अभिजीत, पॅडी, संग्राम, जान्हवी खेळतील. अभिजीत आणि संग्रामला पहिल्या फेरीत बाहेर काढण्याचा प्लान अरबाज (Arbaz Patel) करतो. हा ग्रुप प्लान असतो. तर निक्कीला (Nikki Tamboli) जान्हवीला बाहेर काढायचे असते.

या टास्कच्या पहिल्या फेरीत अरबाज -निक्की आणि संग्राम-जान्हवी चौघे आमने सामने येतात. पहिल्या फेरीत निक्की अंड मिळवण्यास यशस्वी होते. तेव्हा ती संग्राम आणि अभिजीतला कॅप्टन्सी मधून बाहेर न काढता अंकिता आणि पॅडीदादाला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर काढते. यामुळे अरबाजचा संताप होतो.

बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये तुम्ही अरबाजचे रौद्ररूप पाहू शकता. नक्कीने सर्व गेम बदल्यमुळे अरबाजचा संताप होतो. निक्कीने न सांगता स्वत:चा गेम प्लान करते. हे कारण दोघांमध्ये वादाची ठिणगी ठरते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, अरबाज निक्कीला म्हणतो की, आपण ठरवल्यानुसार तू निर्णय घेतला नाही, त्यावर निक्की उत्तर देते की, "मी विसरले..." हे ऐकताच अरबाजच्या रागाचा पारा चढतो. आता अरबाजचा नवीन गेम प्लान काय असेल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच निक्की आणि अरबाजच्या मैत्रीचे पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

Arbaz Angry On Nikki
Stree 2 OTT Release : सरकटेची दहशत आता घरबसल्या अनुभवा, OTT वर कधी रिलीज होणार 'स्त्री 2'?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com