Hair Fall Problems : केस कोरडी होऊन सतत तुटताय? केसगळतीवर अंड ठरेल रामबाण!

Remedies For Hair Fall : वाढत्या थंडीचा प्रभाव आपल्या त्वचेवरच नाही तर केसांवर सुद्धा दिसून येतो. त्वचेसारखे केस सुद्धा ड्राय आणि कमजोर होऊ लागतात.
Hair Fall Probem
Hair Fall Probem Saam Tv
Published On

Hair Fall Mask : वाढत्या थंडीचा प्रभाव आपल्या त्वचेवरच नाही तर केसांवर सुद्धा दिसून येतो. त्वचेसारखे केस सुद्धा ड्राय आणि कमजोर होऊ लागतात. थंडीच्या दिवसांमध्ये सर्वात जास्त केस ड्राय होण्याचे कारण म्हणजे गरम पाण्याचा वापर.

गरम पाण्याने केस धुतल्यावर केस (Hair) जास्त प्रमाणात ड्राय पडतात आणि लवकर तुटून जातात. थंड हवा आणि कोरडे वातावरण हे आपल्या केसांमधील ड्रायनेस वाढवते.

आपले केस ड्राय आणि फ्रीझी होतात त्यामुळे केस खूपच खराब आणि कमजोर पडून लवकर तुटून जातात. अशातच थंडीमध्ये केसांवरती कुठल्याही केमिकल प्रोजेक्टचा वापर करणे हे अतिशय हानिकारक ठरू शकते.

केमिकल प्रोडक्ट्सचा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या केसांवरती होऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही अशा घरगुती पद्धती सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमचे केस नॅचरल (Natural) पद्धतीने हेल्दी बनवू शकता. काही होम रिमेडीचा वापर करून थंडीमध्ये देखील तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता.

Hair Fall Probem
Hair Falls Problem: वजन कमी तर होतेच पण केसगळतीची समस्या अधिक का? जाणून घ्या कारण

केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी अंड आणि मध, त्याचबरोबर नारळाच्या तेलाचा वापर तुम्ही करू शकता. तुमच्या केसांवरती हे तीन इन्ग्रेडियंट जादू सारखे काम करतील. या तीन गोष्टी मिक्स करून केसांसाठी एक चांगला हेअर मास्क बनवू शकता.

अंड्याचा पिवळा भाग तुमच्या केसांसाठी अतिशय फायदेशीर असतो. अंड्याच्या पिवळ्या भागाने केसांना प्रोटीन भेटते त्याचबरोबर केसांची ग्रोथ देखील होते. त्याचबरोबर या मास्क मध्ये उपलब्ध असणारे मधाचे अँटी फंगल गुणधर्म हे डँड्रफवर उपचार करतील.

त्याचबरोबर नारळाच्या तेलामध्ये लोरिक ऍसिड असते जे केसांना मजबूत बनवण्यासाठी काम करते. त्याचबरोबर हेअर फॉल पासून देखील वाचवते. केसांना मॉइश्चराइज करण्यासाठी नारळाचे तेल हे अतिशय फायदेशीर असते. याचा वापर केल्याने केसांमधील ड्रायनेस दूर होतो. चला तर मग पाहूयात अंड, नारळाचे तेल आणि मधाचा मास्क कसा बनवायचा.

Hair Fall Probem
Hair Fall Reasons: 'या' पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे गळतात अधिक केस, जाणून घ्या

हेअर फॉलपासून वाचण्यासाठी हेअर मास्क -

शिया बटर - तीन चमचे, मध - तीन चमचे, अंड - एक पीस, नारळाचे तेल - तीन चमचे

हा हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वात आधी एका वाटीमध्ये शिया बटर , मध आणि अंड घेऊन चांगले मिक्स करून घ्या. या पेस्टला चमच्याने तोपर्यंत हलवत रहा जोपर्यंत घट्ट होत नाही. या पेस्टला ढवळत राहायला नंतर त्यामध्ये थोडसं नारळाचं तेल मिसळावा.

तुमचा हेअर मास्क तयार झाला आहे. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्या मधून दोन वेळा लावू शकता. सतत वापराने तुम्हाला हेअर फॉल आहे ड्राय हेअर पासून आराम मिळेल.

हेअर मास्कने केसांना होणारे फायदे -

हा हेअर मास्क केसांना लावल्यावर केसांना पोषण मिळते आणि केस मजबूत होतात. त्याचबरोबर तुमचे डॅमेज हेअर सुद्धा रिपेअर होण्यास मदत होते. त्याचबरोबर हेअर फॉल देखील थांबतो.

या मास्कमध्ये उपलब्ध असणारे नारळाचे तेल हे तुमच्या केसांना मॉइश्चराईज करते आणि केस शायनी आणि मुलायम बनवते. त्याचबरोबर थंडीच्या दिवसांमध्ये डँड्रफपासून ग्रस्त असलेल्या लोकांनी हेयर मास्क जरूर वापरले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com