Hair Falls Problem: वजन कमी तर होतेच पण केसगळतीची समस्या अधिक का? जाणून घ्या कारण

बऱ्याचदा वेटलॉस जर्नीमध्ये किंवा डायटिंग करताना शरीरामधील ताणतणावामुळे हार्मोन्स इनबॅलन्सची समस्या दिसून येते.
Hair Falls Problem
Hair Falls ProblemSaam Tv

Hair Falls Problem : आपल्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमी झाल्याबरोबर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला दिसून येतो. बऱ्याचदा वेटलॉस जर्नीमध्ये किंवा डायटिंग करताना शरीरामधील ताणतणावामुळे हार्मोन्स इनबॅलन्सची समस्या दिसून येते.

विशेषतज्ज्ञांच असं म्हणणं आहे की, वजन कमी करताना केस जास्त प्रमाणात गळतात. याचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिनची (Vitamins) कमतरता. याव्यतिरिक्त देखील अनेक प्रभाव पडतात ज्यामुळे वजन तर कमी होत पण केसगळती अजून वाढते.

Hair Falls Problem
Hair Falls Problem : केसगळतीमुळे त्रस्त आहात ? 'हे' करुन पहा, 15 दिवसांत मिळेल रिजल्ट

1. वजन कमी केल्यानंतर केस का गळतात ?

 • एका शोधानुसार, वजन अचानक कमी होणे म्हणजे आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश तीव्र टेलोजन एफ्लूवीएमशी निगडित असते.

 • जे केस गळण्याच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे.

 • शोधानुसार वेगवेगळ्या प्रकारची केस गळणे, वजन कमी होणे आणि प्रतिबंधित आहारापासून (food) जोडलेल्या पोषक तत्वांच्या कमीमुळे होते.

 • क्रोनिक टेलोजन एल्फुवीयम, हे सहा महिन्यापेक्षा जास्त काळ राहते आणि इंड्रोजनिक ब्लाडनेस ज्याला बऱ्याचदा पुरुष किंवा महिला पॅटर्न टक्कलेपणाच्या रुपामध्ये ओळखले जाते.

 • तुमच्या केसांची (Hair) व्यवस्थित वाढ होण्यासाठी पर्याप्त प्रमाणात कॅलरी आणि पोषक तत्वांची आवश्यकता असते.

 • तुमच्या शरीरालाही पोषक तत्वे भेटत नाहीत. तेव्हा केस गळणे यांसारख्या समस्या विकसित होऊ शकतात.

Hair Falls Problem
Hair Falls Problemcanva

2. डाएटिंग आणि केस गळणे यांमधील संबंध :

 • क्रॅश डाएटिंग (diet), जिला बऱ्याचदा यो - यो डायटिंग म्हणून ओळखले जाते.

 • हा अतिशय कमी कॅलरी असणारा आहार आहे जो तुम्हाला वजन कमी करण्यासाठी भरपूर मदत करतो.

 • बऱ्याच अध्ययनांमध्ये केस गळण्याचे कारण म्हणजे वजन कमी करणे, कॅलरी प्रतिबंध करणे, व्हिटॅमिनची कमी आणि डाएटिंगचे पालन केल्यानंतर होणाऱ्या मनोवैज्ञानिक तणावांना जोडलेले असते.

 • यामुळे केसांना प्रोटीन निर्माण करण्यासाठी अमिनो ऍसिडची आवश्यकता असते.

 • तुमच्या आहारामधील प्रोटीनच्या कमीमुळे तुमचे केस गळू शकतात.

 • जर तुम्ही कमी कॅलरीपासून आपलं वजन कमी करायचं नियोजन करताय तर त्यामध्ये प्रोटीन कमी प्रमाणात असते. यामुळे तुमचे केस गळतात.

 • त्याचबरोबर लिमिटेड डाइट जी संपूर्ण खाद्यपदार्थाना संपवते. जसे की क्रॅश डाएट, पोषक तत्त्व कमी असल्याने किंवा ताणतणावामुळे केस गळण्याला प्रभावित करू शकते.

 • तुमच्या शरीरामध्ये आयन, जींक, प्रोटीन, सेलेनियम आणि फॅटी एसिडची कमी असल्याने केस गळतात.

3. केस गळणे हानिकारक आहे का ?

 • केस स्वतःहून गळायला लागली की, ती तेवढी हानिकारक नसतात परंतु, वजन कमी झाल्यानंतर केस गळण्याच्या कारणाला इतर निर्मित समस्या उद्भवू शकते.

 • उदाहरणार्थ पोषक तत्वांची कमी आणि अत्याधिक कॅलरी प्रतिबंधचे गंभीर स्वास्थ्य प्रभाव होऊ शकते.

 • जसे की आयनची कमी, एनिमिया, मासपेशींचेचे नुकसान यांसारखे अनेक कारणे आहेत.

 • केस गळण्याच्या संभावित कारणांशिवाय आयनची कमी झाल्यावर एनीमिया, संज्ञानात्मक कार्य कमी होणे, हृदयासंबंधीचे आजार, डिप्रेशन आणि प्रतिरक्षा प्रणालीच्या कार्यामधील बदलाचे कारण बनू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com