Shraddha Kapoor- Rajkummar Rao
Stree 2 OTT ReleaseSAAM TV

Stree 2 OTT Release : सरकटेची दहशत आता घरबसल्या अनुभवा, OTT वर कधी रिलीज होणार 'स्त्री 2'?

Shraddha Kapoor- Rajkummar Rao : 'स्त्री 2' ने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता स्त्री OTT वर येण्यासाठी सज्ज झाली आहे. ओटीटीवर 'स्त्री 2' कधी रिलीज होणार जाणून घ्या.
Published on

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार रावच्या (Rajkummar Rao) 'स्त्री 2' ने जगभर बंपर कमाई केली आहे. 'स्त्री 2'ने अनेक रेकॉड ब्रेक केले आहेत. आता स्त्री ओटीटीवर येणार आहे. चाहते 'स्त्री 2' च्या ओटीटी रिलीजची (Stree 2 OTT Release) आतुरतेने वाट पाहत होते. 'स्त्री 2' 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'स्त्री 2'ने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफीसवर जबरदस्त कमाई करण्यास सुरुवात केली होती. या चित्रपटांने कोटींचा व्यवसाय केला आहे.

नुकतीच 'स्त्री 2' च्या ओटीटी रिलीज डेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'स्त्री 2' 27 सप्टेंबरला अ‍ॅमेझॉन प्राइवर (Amazon Prime) रिलीज होणार आहे. पण यात एक मोठा अपडेट आहे की, सुरुवातीच्या काळात हा चित्रपट पैसे भरून पाहावा लागणार आहे. मात्र काळानंतर 'स्त्री 2' ओटीटीवर विनामूल्य पाहता येईल. यासाठी तुम्हाला २७ सप्टेंबरनंतर वाट पाहावी लागेल.

आतापर्यंत 'स्त्री 2' भारतात 585 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावसोबतच पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत आहेत. 'स्त्री 2' या चित्रपटाचे दिग्दर्शिन अमर कौशिक यांनी केले आहे. या चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली आहे. 'स्त्री 2' हा नंबर 1 चा चित्रपट बनला आहे. 'स्त्री 2' हा 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्त्री 'चित्रपटाचा सीक्वेल आहे.

Shraddha Kapoor- Rajkummar Rao
Kareena Kapoor: करिअरच्या २५ वर्षांनंतर येणार बॉलिवूडच्या बेबोचा सर्वात महागडा चित्रपट; कधी होणार रीलीज?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com