Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरसाठी 'यंदाचा गुढी पाडवा आहे खास', नेमकं कारण काय?

Special Celebration: कायमच अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर. अमृता खानविलकर म्हणते " यंदाचा गुढी पाडवा आहे खास" कारण काय जाणून घ्या.
Amruta Khanvilkar
अमृता खानविलकरसाठी 'यंदाचा गुढी पाडवा आहे खास', नेमकं कारण काय?Saam Tv
Published On

सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच आपल्या अभिनयाने आणि नवनवीन प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांचं मन जिंकते. यंदाचा गुढी पाडवा तिच्यासाठी खास आहे कारण ती तो स्वतःच्या नव्या घरात "एकम" मध्ये साजरा करत आहे.

मुंबईत अमृताने अलीकडेच स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. अमृता सांगते, "गुढीपाडवा माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा सण आहे. दिवाळीनंतर हा माझ्यासाठी सर्वात खास सण आहे. लहानपणापासून बाबांनी शिकवलेली गुढीची महत्त्वाची शिकवण आजही माझ्या मनात आहे. 'गुढी आकाशाला भिडली पाहिजे' ही शिकवणच माझ्या आयुष्याची दिशा ठरली."

Amruta Khanvilkar
Amruta Khanvilkar : बाबो! चंद्रा करणार आयटम साँग, 'चिऊताई' गाण्याची पहिली झलक पाहिलीत का?

नव्या घराविषयी ती म्हणते, "एकम हे माझं खरंखुरं घर आहे. येथे केवळ माझी जागा मिळाली असं नाही, तर मी स्वतःला सापडली आहे. या घराने मला नवी उमेद, आत्मविश्वास, आणि स्थैर्य दिलं आहे."

अमृता लवकरच सुशीला - सुजीत या चित्रपटात पहिल्यांदाच आयटम साँग करताना दिसणार आहे. तसेच, अनेक हिंदी आणि मराठी प्रोजेक्ट्समध्ये तिच्या दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत. यंदाचा गुढी पाडवा अमृतासाठी नवी सुरुवात घेऊन आला आहे, आणि तिच्या नव्या स्वप्नांचा प्रवास आता आणखी तेजस्वी होणार आहे.

Edited By - Purva Palande

Amruta Khanvilkar
Amruta Khanvilkar: मराठी इंडस्ट्री ते बॅालिवूड गाजवणारी मराठमोळ्या अमृता खानविलकरची एकूण संपत्ती किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com