ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या दमदार अभिनयासह, सौंदर्य, अदा आणि फॅशनने अमृताने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. तिने कमी काळातच मराठी इंडस्ट्री आणि बॅालिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले.
अमृताचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ मध्ये झाला होता. तिने केवळ आपल्या अभिनयानेच नाही तर दमदार नृत्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
अमृता खानविलकर ही टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीपैंकी एक आहे. रिपोर्टनुसार अमृता एका टिव्ही एपिसोडसाठी १० त १२ लाख रूपये इतक मानधन घेते.
अमृताने हिंदी रिअलिटी शो खतरो के खिलाडी आणि झलक दिखलाजा १०मध्ये भाग घेतला होता. या शोच्या एका एपिसोडसाठी तिने १० लाख रूपये इतकी फि चार्ज केली होती.
अमृताने दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत लक्झरीयस फ्लॅट घेतला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अमृता खानविलकरची एकूण संपत्ती ५० कोटी आहे.
अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील किंवा कामाबद्दलचे फोटो शेअर करत असते.