ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर वसलेला ऐतिहासिक सिंधुदुर्ग जिल्हा सुंदर बीचेस आणि किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे.
अंबोली हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात नैसर्गिक सौंदर्याने नटलेले हिल स्टेशन आहे.
जर तुम्हाला नैसर्गिक सौंदर्याने नटलेले नयनरम्य दृश्ये आणि शांततेचे क्षण अनुभवायचे असेल तर महाराष्ट्रात स्वर्गाहून सुंदर असलेल्या या हिल स्टेशनला नक्की भेट द्या.
या हिल स्टेशनवर तुम्ही पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग आणि सायकलिंग सारख्या अॅक्टीव्हीटीचा आनंद घेऊ शकता.
येथे तुम्हाला ढगांनी वेढलेले डोंगर दिसतील, असे वाटेल जणून की ढग जमिनीवर उतरले आहेत. ही मनमोहक दृश्ये तुम्हाला भुरळ घालतील.
अंबोली हिल स्टेशनजवळच असलेले नांगरतास धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. हा धबधबा एका अरुंद दरीत आहे.
या पॅाईंटवर तुम्ही सुंदर नैसर्गिक दृश्यांचा अनुभव घेऊ शकता. तसेच सनराईज आणि सनसेटची नयनरम्ये दृश्ये तुमचा क्षण अविस्मरणीय करेल.
सिंधुदुर्गापासून अंबोली हिल स्टेशन १०५ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच सावंतवाडीपासून हे हिल स्टेशन ३१ किलोमीटर अंतरावर आहे य तुम्ही येथे बस, रेल्वे किंवा खासगी कारने देखील येथे पोहचू शकता.