ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने छोट्या पडद्यावर वेगळा ठसा उमटवला आहे.
रेश्मा शिंदे सध्या स्टार प्रवाहवरील मालिका 'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये जानकी रणदीवे ही मुख्य भूमिका साकारत आहे.
रेश्मा शिंदेचा जन्म २७ मार्च १९८७ रोजी मुंबईत झाला.
२०१० मध्ये तिने महाराष्ट्राचे सुपरस्टार या मराठी रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.इथूनच तिच्या करिअरला सुरूवात झाली.
रेश्माने 'बंध रेशमाचे' या मालिकेतून टिव्ही जगात पदार्पण केले. याशिवाय नांदा सौख्य भरे, चाहूल, लगोरी- मैत्री रिटर्न्स, आणि विवाह बंधन या मालिकेतही महत्वाची भूमिका साकारली. तिने 'देवा एक अतरंगी' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
रेश्मा ही पदवीधर आहे. तिचे शालेय शिक्षण आणि पदवीचे शिक्षण मुंबईत झाले. रेश्मा बालपणात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवांमध्ये सहभाग घेत असे.
'रंग माझा वेगळा' या मालिकेमधून रेश्मा घरोघरी पोहोचली. या मालिकेत साकारलेल्या दिपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळाली.
अभिनेत्री रेश्मा २०२४ मध्ये दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली. पवनबरोबर लग्नगाठ बांधत रेश्माने तिच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.