ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ दिल्लीमध्ये झाला होता. कोहलीची फॅन फॅालोइंग खूप मोठी आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 270 मिलियन फॅालोअर्स आहे.
विराट कोहली हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंपैकीएक आहे. महागड्या कार ते आलिशान घर तुम्हाला माहितीये का विराट कोहलीचे नेटवर्थ किती.
रिपोर्टनुसार, लक्झरी आयुष्य जगणाऱ्या विराट कोहलीची एकूण संपत्ती १२७ मिलियन डॅालर्स म्हणजेच १०५० कोटी आहे. काही दिवसांपूर्वीच फॅार्च्युन इंडियाच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत कोहलीचा समावेश करण्यात आला.
भारतीय संघाकजून कोहलीला एका कसोटीसाठी १५ लाख, वनडेसाठी ६ लाख आणि टी- ट्वेन्टीसाठी ३ लाख रूपये मिळतात. याशिवाय, बीसीसीआयच्या A+ कराराद्वारे वर्षाला ७ कोटी मिळतात. तसेच IPL मधूनही कमाई होते.
क्रिकेट शिवाय कोहली सोशल मीडिया द्वारे सुद्धा पैसे कमवतो. विराटचे इन्स्टाग्रामवर २७० मिलियन फॅालोअर्स आहेत. प्रत्येक पोस्टसाठी तो ६ ते ११ कोटी रूपये चार्ज करतो.
विराटच्या कमाईचा एक मोठा भाग ब्रँडच्या जाहीरातीमधून येतो. विराट अनेक मोठ्या ब्रँडचा ब्रँड अम्बेसडर आहे. याशिवाय कोहलीने अनेक कंपन्यामद्ये गुंतवणूक केली आहे.
रिपोर्टनुसार, कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी क्यू ७, ऑडी आरएस ५, लँड रोव्हर वोग, ऑडी आर ८ एलएमएक्स सारख्या कारचा समावेश आहे. तसेच यामध्ये कोटीची बेन्टली कारचाही समावेश आहे.
विराट कोहली जगभरातल्या क्रिकेटपटूमध्ये सर्वाधिक टॅक्स भरणारा क्रिकेटर आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कोहलीने ६६ कोटी रुपये अॅडव्हान्स टॅक्स भरले होते.