Pushpa 2 Released Date Out
Pushpa 2 Released Date OutSaam Tv

Pushpa 2 Release Date: 'पुष्पा येतोय...' अखेर अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Allu Arjun Movie: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आता ग्लोबल स्टार झाला आहे.
Published on

'Pushpa 2: The Rule' Release Date Announced:

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आता ग्लोबल स्टार झाला आहे. पुष्पा: द रुल या चित्रपटाने त्याला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली. तसेच अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

पुष्पाची क्रेझ अजून प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे प्रेक्षक 'पुष्पा २' पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या अपडेट वेळोवेळी चित्रपटातील कलाकार आणि निर्माते देत आहेत.

Pushpa 2 Released Date Out
Kaun Banega Crorepati: हॉट सीटवरील स्पर्धक थंडीने कुडकुडाला, बिग बींनी थेट स्वतःच जॅकेट केलं गिफ्ट

पुष्पा २ च्या निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाच्या रिलीजविषयी मोठी अपडेट शेअर केली आहे. ही अपडेट ऐकून प्रेक्षक खूप खुश होतील हे नक्की.

निर्मात्यांनी 'पुष्पा: द राईज' म्हणजे पुष्पा २ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे.

पुष्पा २च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली आहे. या घोषणेसह अल्लू अर्जुनाचा एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो पाहून तुम्हाला चित्रपटाच्या कथेविषयी थोडे प्रश्न देखील पडू शकतात. (Latest Entertainment News)

पुष्पा २ चित्रपटाचा टीझर एप्रिलमध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये पुष्पा तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचे दाखवण्यात आले होते. त्याचा शोध सुरूच होता, पण तो कोणाच्याच हाती लागला नव्हता. 20 सेकंदाच्या व्हिडिओच्या शेवटी अल्लू अर्जुनची झलक दाखवण्यात आली होती.

'पुष्पा २' अपडेट प्रेक्षकांसाठी नेहमीच सुखद धक्का असतो. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनने त्याचा सेटवरील व्हिडीओ शेअर केला होता. तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने देखील शूटींगचा BTS व्हिडीओ शेअर केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com